चित्रपट सृष्टीतील या निर्मात्याने 2000 कोटींचे ड्रग्स पाठवले विदेशात, एक-दोन नव्हे ४५ वेळा…
एनसीबीने दिल्लीत तीन जणांना ड्रग्स तस्कारी प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर जफर सादिकचा शोध सुरु होता. जफर सादिक दक्षिण भारतातील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहेत. त्यांच्या काही चित्रपटाचे काम सुरु आहे.
नवी दिल्ली | दि. 9 मार्च 2024 : अंमली पदार्थ नियंत्रण (एनसीबी) विभागाने ड्रग्स प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. दक्षिण भारतातील चित्रपट सृष्टीतील बड्या निर्मात्याला अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. चित्रपट निर्माता जफर सादिक असे त्यांचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून एनसीबी त्यांच्या शोधात होती. जफर सादिक यांनी आतापर्यंत दोन हजार कोटींचे ड्रग्स विदेशात पाठवले आहे. 45 वेळा सूडोएफिड्रिन नावाचे ड्रग्स त्यांनी विदेशात पाठवले आहे. जफर सादिक राजकारणातही आहे. डिएमके पक्षाचे डिप्टी सेक्रेटरी ते राहिले आहेत. या प्रकरणानंतर डीएमकेकडून त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणानंतर चित्रपटसृष्टी आणि राजकारणातही खळबळ माजली आहे.
तीन जणांना अटक
एनसीबीने दिल्लीत तीन जणांना ड्रग्स तस्कारी प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर जफर सादिकचा शोध सुरु होता. जफर सादिक दक्षिण भारतातील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहेत. त्यांच्या काही चित्रपटाचे काम सुरु आहे. एक चित्रपट आता प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. चार चित्रपट त्यांचे पूर्ण झाले आहे. काही दिवसांपूर्वी एनसीबीने जफर सादिक याच्या ड्रग्स प्रकरणाचा खुलासा केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जफर सादिक ड्रग्सची तस्करीत गुंतल्याचे एनसीबीचा दावा आहे.
50 किलो सूडोएफिड्रिन जप्त
एनसीबीने सादिकला भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये पसरलेल्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या म्हणून संबोधले आहे. गेल्या महिन्यात, NCB ने दिल्लीतील एका गोदामावर छापा टाकून तिघांना अटक केली होती आणि ड्रग बनवणारे 50 किलो केमिकल सूडोएफिड्रिन जप्त केले होते.
NCB has apprehended Jaffer Sadiq, the kingpin in the India-Australia-New Zealand Drug trafficking network being investigated by us: Narcotics Control Bureau (NCB)
— ANI (@ANI) March 9, 2024
पक्षातून केले निलंबित
ड्रग्ज प्रकरणात सादिकचे नाव समोर आल्यानंतर द्रमुकने त्यांची पक्षातून हाकालपट्टी केली आहे. पक्षाची बदनामी करणाऱ्या कारवायांमध्ये गुंतल्या प्रकरणात त्यांची हकालपट्टी केली. सादिकचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कार्टेलशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे.