बृजभूषण सिंह यांना धक्का, क्रीडा मंत्रालयाची मोठी कारवाई

कुस्तीपटू आणि भारतीय कुस्ती महासंघाची रविवारी होणारी AGM बैठक रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर गोंडा येथे सुरू असलेली राष्ट्रीय कुस्ती स्पर्धाही रद्द करण्यात आली आहे.

बृजभूषण सिंह यांना धक्का, क्रीडा मंत्रालयाची मोठी कारवाई
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 11:55 AM

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्यावर देशातील स्टार महिला पैलवानांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. टोकिओ ऑलम्पिक स्पर्धेत कांस्य पदक विजेता बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेत्या महिला पैलवान विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांच्यासह अनेक पैलवानांनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैगिंक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघावर मोठी कारवाई केली आहे.

बैठक केली रद्द

कुस्तीपटू आणि भारतीय कुस्ती महासंघाची (WFI) रविवारी होणारी AGM बैठक रद्द करण्यात आली आहे. अयोध्येतील हेरिटेज हॉटेलमध्ये सकाळी १० वाजता होणारी ही बैठक होणार होती. त्याचबरोबर गोंडा येथे सुरू असलेली राष्ट्रीय कुस्ती स्पर्धाही रद्द करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयाच्या आदेशानंतर WFI चे सर्व उपक्रम सध्या स्थगित केले आहेत. क्रीडा मंत्रालयाने WFI चे सर्व कार्यक्रम स्थगिती देण्याचे आदेश दिले होते. तसेच कुस्ती महासंघाचे सहायक सचिव विनोद तोमर यांना अनुशासनाच्या आरोपाखाली निलंबित केले आहे. विनोदवर खेळाडूंकडून लाच घेऊन करोडोंची संपत्ती बनवल्याचा आरोप आहे.

हे सुद्धा वाचा

काय दिले आदेश

क्रीडा मंत्रालयाने बृजभूषण सिंह यांना महासंघाच्या कामांपासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्यावरील आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत ते कुस्ती संघटनेच्या कामांपासून दूर राहणार आहेत. मात्र, त्यांना पदावरून हटवण्यात आलेले नाही. तपासात निर्दोष आढळल्यास ते त्यांच्या पदावर कायम राहतील.

क्रीडा मंत्रालयाने निलंबित करण्यापूर्वी सहायक सचिव विनोद तोमर सांगितले होते की, महासंघातील अनेक जण बृजभूषण यांच्यासोबत आहेत. वैयक्तिकरित्या मला खेळाडूंचे आरोप योग्य वाटत नाहीत. मी बृजभूषण यांच्यांसोबत गेल्या १२ वर्षांपासून आहे. खेळाडूंचे आरोप निराधार आहेत. तीन-चार दिवस झाले असून त्यांनी अद्याप पुरावा सादर केलेला नाही.

काय आहे प्रकरण

बजरंग पूनिया, विनेश फोगाट, आसू मलिक, साक्षी मलिक, सत्यव्रत कादियान, अंतिम पंघाल, रवि दहिया, दीपक पूनिया, संगीता फोगाट, सरिता मोर, सोनम मलिक, महावीर फोगाट, कुलदीप मलिक यांच्यांसह जवळपास ३० पैलवानांनी बृजभूषण यांच्यांवर लैगिंक शोषणाचे आरोप केले आहे. बजरंग पूनिया हिने टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत रजत पदक मिळवले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेत चार पदक मिळवले आहे. तर  साक्षी मलिक  रियो ऑलंपिक पदक विजेता खेळाडू आहे. २०१४ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक पटकवले होते. आशिया कुस्ती स्पर्धेत कास्य पदक जिंकला आहे

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.