‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’चा उद्घाटन समारोह, चिन्ना जियार स्वामींकडून पंतप्रधान मोदींना निमंत्रण

रामानुज संप्रदायाचे सध्याचे आध्यात्मिक प्रमुख त्रिदंडी चिन्ना जियार स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. यावेळी चिन्ना जियार स्वामी यांच्यासह माय होम ग्रुपचे चेअरमन डॉ. रामेश्वर रावही उपस्थित होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या प्रतिमेचं उद्घाटन करणार आहेत.

'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी'चा उद्घाटन समारोह, चिन्ना जियार स्वामींकडून पंतप्रधान मोदींना निमंत्रण
चिन्ना जियार स्वामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला, सोबत माहय होम ग्रुपचे चेअरमन डॉ. रामेश्वर राव
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 8:08 PM

नवी दिल्ली : श्री रामानुजाचार्य स्वामी यांच्या 1 हजाराव्या जंयतीनिमित्त आयोजित श्री रामानुज सहस्त्राब्दी उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. रामानुज संप्रदायाचे सध्याचे आध्यात्मिक प्रमुख त्रिदंडी चिन्ना जियार स्वामी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. यावेळी चिन्ना जियार स्वामी यांच्यासह माय होम ग्रुपचे चेअरमन डॉ. रामेश्वर रावही उपस्थित होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या प्रतिमेचं उद्घाटन करणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. (Tridandi Chinna Jiyar Swamy invites Prime Minister Narendra Modi to inaugurate Statue of Equality)

मोदींकडून चिन्ना जियार स्वामी यांच्या समर्पणाची प्रशंसा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुचिंतलला भेट देण्याचं आणि प्रतिमेचं अनावरण करण्याचं आमंत्रण स्वीकारलं आहे. 5 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी प्रतिमेचं अनावरण करण्यासाठी मुचिंतलला उपस्थित राहतील. पंतप्रधान मोदी म्हणाले की, एवढा विशाल समानतेची प्रतिमा उभारणे हे खरोखरच मोठे कार्य आहे आणि त्रिदंडी चिन्ना जियार स्वामींच्या समर्पणाची प्रशंसाही मोदी यांनी यावेळी केली.

chinna jeeyar swamy and PM Narendra Modi 1

चिन्ना जियार स्वामी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण

अमित शाह यांचे ट्वीट

चिन्ना जियार स्वामी यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनाही निमंत्रण दिलं आहे. त्यानंतर अमित शहा यांनी ट्वीट केले होते, ” आज श्री श्री श्री त्रिदंडी चिन्ना श्रीमन्नारायण रामानुज जियार स्वामीजींना भेटण्याचे मोठे भाग्य लाभले. मानवजातीसाठी त्यांची निस्वार्थ सेवा आणि श्री रामानुजाचार्यजींच्या विचारांचा प्रसार करण्याची भक्ती खरोखरच महान आहे ”

श्री रामानुजाचार्य स्वामी यांची 216 फुटी भव्य प्रतिमा

श्री रामानुजाचार्य स्वामी यांच्या आठवणी जागवण्यासाठी आणि सन्मानासाठी मोठ्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हैदराबादजवळ शमशाबादमध्ये निर्मित एका मोठा आश्रमात त्यांच्या प्रतिमेच्या अभिषेकासह 1000 व्या वार्षीक सोहळ्याला सुरुवात होईल. स्वामींची 216 फूट उंच प्रतिमा बनवण्यात आली आहे, जी जगातील दुसरी सर्वाच उंच प्रतिमा आहे. रामानुजाचार्यांच्या सर्व भक्तांची आपल्या देवतांची पूजा करण्याच्या अधिकारांची रक्षा करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मूर्तीला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असं संबोधलं जात आहे.

लोककल्याणासाठी महायज्ञाचं आयोजन

सहस्रहुंदात्माका लक्ष्मी नारायण यज्ञ लोककल्याणासाठी केला जाणार आहे. या मेगा इव्हेंटसाठी बांधण्यात आलेल्या 1,035 होम कुंडांमध्ये सुमारे दोन लाख किलो गाईचे तूप वापरण्यात येणार आहे. मुचिंतल येथील विस्तीर्ण आध्यात्मिक सुविधा “दिव्य साकेत” लवकरच जगप्रसिद्ध आध्यात्मिक ठिकाण म्हणून उदयास येईल. हे चिन्ना जीयर यांचे स्वप्न असल्याचं त्यांनी सांगितलं. तब्बल एक हजार कोटी रुपये खर्च करून हा मेगा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पुतळ्याच्या बांधकामात 1800 टन लोखंड वापरला आहे. तर उद्यानाभोवती 108 दिव्यदेश किंवा मंदिरे बांधलेली आहेत.

Chinna Jeeyar Swami and narendra modi 2

चिन्ना जियार स्वामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कार्यक्रमाची माहिती देताना

कोण आहेत रामानुजाचार्य?

रामानुजाचार्य यांचा जन्म 1017 मध्ये तमिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे कांतीमाती आणि केसावाचार्युलू यांच्याकडे झाला. भक्तांचा असा विश्वास आहे की हा अवतार स्वतः देवाच्या आदेशानं घेतला आहे. त्यांचे शिक्षण कांची अद्वैत पंडितांच्या मार्गदर्शनाखाली वेदांत मध्ये झालं. त्यांनी विशिष्ठद्वैत विचारधारा स्पष्ट केली आणि मंदिरांना धर्माचे केंद्र बनवले. रामानुजांना यमुनाचार्यांनी वैष्णव दीक्षामध्ये प्रवेश दिला. त्यांचे आजोबा अलावंदरू हे श्रीरंगम वैष्णव मठाचे धर्मगुरू होते. ‘नंबी’ नारायणाने रामानुजाला मंत्र दीक्षाचा उपदेश केला. तिरुकोष्टियारूंनी ‘द्वैय मंत्रा’चे महत्त्व समजावून सांगितले आणि रामानुजम यांना मंत्राचं गुपीत राखण्यास सांगितलं. रामानुजाला वाटले की ‘मोक्ष’ हा काही लोकांपुरता मर्यादित राहू नये. त्यामुळे तो पुरुष आणि स्त्रियांना सारख्याच पवित्र मंत्राची घोषणा करण्यासाठी श्रीरंगम मंदिर गोपुरम वर चढला.

रामानुजाचार्य स्वामी यांनी दलित लोकांना उच्चभ्रूंच्या बरोबरीने वागले. त्यांनी समाजात अस्तित्वात असलेल्या अस्पृश्यता आणि इतर दुर्गुणांचा नायनाट केला. त्यांनी प्रत्येकाला देवाची उपासना करण्याचा समान विशेषाधिकार दिला. अस्पृश्य म्हणवल्या जाणाऱ्या लोकांना त्यांनी “तिरुकुलाथर” असं संबोधलं. याचा अर्थ “जन्माला आलेला देव” आणि त्यांना मंदिराच्या आत नेले. त्यांनी भक्ती चळवळीचे नेतृत्व केले तसंच तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला.

इतर बातम्या :

कोण आहेत सुनिल जाखड, ज्यांचं नाव पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक आघाडीवर आहे? वाचा सविस्तर

सरकार 5 वर्षे टिकणार हे तुम्हाला सातत्याने बोलावं का लागतं? आशिष शेलारांचा राऊतांचा खोचक सवाल

Tridandi Chinna Jiyar Swamy invites Prime Minister Narendra Modi to inaugurate Statue of Equality

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.