AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंडमध्ये राहून काश्मीरमधला बदल कसा दिसणार, अमित शहांचा राहुल गांधीना टोला

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दोन महत्त्वाचे विधेयक लोकसभेत सादर केले. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काश्मीरी पंडिताना न्याय आणि हक्क देण्याचं काम मोदी सरकारने केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी राहुल गांधीवर ही टीका केली.

इंग्लंडमध्ये राहून काश्मीरमधला बदल कसा दिसणार, अमित शहांचा राहुल गांधीना टोला
Amit shah on rahul gandhi
| Updated on: Dec 06, 2023 | 5:35 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, 2023 आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक, 2023 विचारार्थ लोकसभेत मांडले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘मी जे विधेयक आणले आहे. ते 70 वर्षांपासून ज्यांच्यावर अन्याय झाला, अपमान झाला आणि दुर्लक्ष केले गेले त्यांना न्याय देण्यासाठी आहे.’

अमित शहा यांची काँग्रेसवर टीका

काश्मीरबाबत बोलत असताना अमित शहा यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, जेव्हा ते (काश्मीरी पंडित) विस्थापित झाले तेव्हा त्यांना त्यांच्याच देशात निर्वासित व्हावे लागले. आजच्या आकडेवारीनुसार, 46,631 कुटुंबे आणि 1,57,967 लोक त्यांच्याच देशात विस्थापित झाले आणि अशा प्रकारे विस्थापित झाले की त्यांची मुळे त्यांच्या देशातून आणि राज्यातून उखडली गेली. त्यांना अधिकार देण्यासाठी, त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी हे विधेयक आहे.

कलम 370 रद्द करण्यावर अमित शाह म्हणाले की, “कोणी म्हणतंय कलम 370 रद्द केल्यानंतर काय झाले ? 5-6 ऑगस्ट 2019 रोजी मोदीजींनी त्यांचा (काश्मीरींचा) आवाज ऐकला जो वर्षानुवर्षे ऐकला जात नव्हता आणि आज त्यांना त्यांचा हक्क मिळाला.”

केंद्रीय मंत्री म्हणाले की, “काही लोक विचारत होते की विस्थापित काश्मिरी पंडितांना आरक्षण देऊन काय होईल. काश्मिरी पंडितांना आरक्षण दिल्याने त्यांचा आवाज काश्मीर विधानसभेत गुंजेल आणि पुन्हा विस्थापनाची परिस्थिती निर्माण झाली तर ते थांबवतील.”

भारत-पाकिस्तान युद्ध आणि दहशतवादाचा संदर्भ देताना केंद्रीय मंत्री म्हणाले, “एक प्रकारे काश्मीरमध्ये तीन युद्धे झाली होती! 1947 मध्ये पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले; त्यादरम्यान 31,000 हून अधिक कुटुंबे विस्थापित झाली.

1965 आणि 1971 च्या युद्धात 10,065 कुटुंबे विस्थापित झाली होती. 1947, 1965 आणि 1969 या तीन युद्धांमध्ये एकूण 41,844 कुटुंबे विस्थापित झाली. हे विधेयक त्या लोकांना हक्क देण्याचा, त्या लोकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न आहे.”

अमित शहा यांचा राहुल गांधींवर निशाणा

अमित शाह यांनी पुढे अप्रत्यक्षपणे राहुल गांधींवर निशाणा साधला आणि म्हणाले, “जम्मू-काश्मीरमध्ये काय झाले, असे जे म्हणतात? इंग्लंडमध्ये सुटी साजरी करणाऱ्यांना जम्मू-काश्मीरमध्ये कोणताही बदल दिसणार नाही.

दहशतवादाचा संदर्भ देत अमित शाह म्हणाले, “1994 ते 2004 दरम्यान एकूण 40,164 घटना घडल्या. 2004-14 सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या राजवटीत 7,217 घटना घडल्या. 2014 ते 2023 पर्यंत नरेंद्र मोदी सरकारच्या काळात , या कालावधीत 2,000 ची घट झाली आहे. म्हणजेच 70 टक्क्यांनी घट झाली आहे.”

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.