Greta Thunberg | धमकीचा फरक पडत नाही, शेतकऱ्यांना पाठिंबा सुरूच राहील; ग्रेटाचं नवं ट्विट

भारताविरोधात प्रचार केल्याच्या आरोपाखाली पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्गच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. (Still Stand With Farmers: Greta Thunberg After Delhi Police Files Case)

Greta Thunberg | धमकीचा फरक पडत नाही, शेतकऱ्यांना पाठिंबा सुरूच राहील; ग्रेटाचं नवं ट्विट
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 5:13 PM

नवी दिल्ली: भारताविरोधात प्रचार केल्याच्या आरोपाखाली पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्गच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. त्यावर ग्रेटाने ट्विट केलं आहे. कोणत्याही धमकीचा काहीही फरक पडणार नाही. माझा शेतकऱ्यांना पाठिंबा सुरूच राहील, असं ग्रेटाने म्हटलं आहे. (Still Stand With Farmers: Greta Thunberg After Delhi Police Files Case)

ग्रेटा थनबर्गने ट्विट करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारतातील शेतकरी शांतेत आंदोलन करत आहेत. त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. कोणताही द्वेष, धमकी माझी मानवी हक्कांबाबतची ही भूमिका बदलू शकत नाही, असं ट्विट ग्रेटाने केलं आहे.

पोलिसांकडे पुरावे

पॉप सिंगर रिहानाने भारतीय शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्यानंतर ग्रेटानेही त्याचं समर्थन केलं होतं. ग्रेटाने नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमुळे ही बाब लक्षात आली आहे की, भारताविरोधात प्रचार करण्यासाठी विचारपूर्वक एक कट रचण्यात आला आहे. त्याचे काही पुरावेही मिळाले आहेत. भारताविरोधात कॅम्पेनिंग राबवण्याबाबतचा एक पूर्ण अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. त्यात पोएटिक जस्टिस फाऊंडेशनचंही नाव समोर आलं आहे. ही फाऊंडेशन म्हणजे कॅनडामधील एक NGO आहे. या पार्श्वभूमीवर भारताविरोधात प्रचार केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी ग्रेटा थनबर्गविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

ग्रेटाने ट्वीट केला अॅक्शन प्लॅन

भारताविरोधात प्रचार करण्यासाठी जो अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे त्याचं एक गूगल डॉक्यूमेंट समोर आला आहे. त्याचबरोबर याचीही माहिती मिळाली आहे की, ट्विटर स्ट्रोम क्रिएट करण्यासाठीच रिहानाचं एक ट्वीट आलं होतं. दरम्यान, ग्रेटाने दोन अॅक्शन प्लॅन तयार केले आहेत. एका प्लॅनमध्ये 26 जानेवारीपर्यंतच्या कॅम्पेनिंगची माहिती देण्यात आली होती. ग्रेटाने हे ट्वीट 3 फेब्रुवारीला केलं होतं. आणि नंतर ते डिलीट केलं. 4 फेब्रुवारीला ग्रेटाने पुन्हा एक ट्वीट केलं, त्यात नव्याने तयार करण्यात आलेला प्लॅन होता.

1984 च्या दंगलीची भीती दाखवली

सोशल मीडियावर या प्लॅनिंगचा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनही व्हायरल झालं आहे. या PPTमध्ये पोएटिक जस्टिस फाऊंडेशनचा लोगो लावण्यात आला आहे. या फाऊंडेशनच्या वेबसाईटवर शेतकऱ्यांशी संबंधित प्रोपोगँडा मटेरियलही उपलब्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या सोशल मीडिया साईटवर देशविरोधी, प्रो-खलिस्तान साहित्यही उपलब्ध आहे.

प्रोएटिक जस्टिस फाऊंडेशन कशाप्रकारे लोकांना भडकावण्याचं काम करत होते त्याची काही उदारहरणंही आहेत. त्यात लिहिलं आहे की, सरकार शेतकऱ्यांची हत्या करत आहे. 1984 मध्ये झालेल्या दंगलीची भीती दाखवण्यात आली की, सरकार शेतकऱ्यांचं दमन करण्यासाठी असं काही करु शकते. (Still Stand With Farmers: Greta Thunberg After Delhi Police Files Case)

संबंधित बातम्या:

Greta Thunberg | दिल्ली पोलिसांकडून ग्रेटा थनबर्ग विरोधात FIR, भारताविरोधात प्रचार केल्याचा आरोप

Farmer Protest : शेतकऱ्यांच्याविरोधात खिळ्यांची स्ट्रॅटेजी सरकारवर बुमरँग? कायमचे उखाडणार की नव्या ठिकाणी ठोकणार?

कंगनाला ट्विटरचा झटका, आक्षेपार्ह ट्विट हटवले; अकाउंट बॅन होणार?

सचिनपासून कोहलीपर्यंत शेतकरी आंदोलनावर क्रिकेटपटूंचे ट्विटस् कसे? काँग्रेस नेता म्हणतो, ‘हे तर बीसीसीआयचे काम!’

(Still Stand With Farmers: Greta Thunberg After Delhi Police Files Case)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.