Sukma Naxal attack: 250 नक्षलवाद्यांचा हल्ला, 22 जवान शहीद, पाच तास चकमक, छत्तीसगडमध्ये नेमकं काय घडलं?

छत्तीसगडच्या बिजापूरच्या जंगलात नक्षलवादी आणि सीआरपीएफच्या जवानांची चकमक झाली. (story behind Naxal encounter between security forces in Chhattisgarh)

Sukma Naxal attack:  250 नक्षलवाद्यांचा हल्ला, 22 जवान शहीद, पाच तास चकमक, छत्तीसगडमध्ये नेमकं काय घडलं?
Naxal Encounter
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 3:50 PM

बिजापूर: छत्तीसगडच्या बिजापूरच्या जंगलात नक्षलवादी आणि सीआरपीएफच्या जवानांची चकमक झाली. यात नऊहून अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवांना यश आलं असली तरी या चकमकीत 22 जवान शहीद झाले आहेत. 250 नक्षलवाद्यांशी सामना करताना जवानांनी पाच तास झुंज दिली. या ठिकाणी आता सर्च ऑपरेशन सुरू आहे. नेमकं छत्तीसगडमध्ये काय घडलं? त्याचा घेतलेला हा आढावा. (story behind Naxal encounter between security forces in Chhattisgarh)

नक्षलवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या 24 जवानांना बिजापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सात जवानांना रायपूरमध्ये नेण्यात आले आहे. सुरक्षा दलाने कोब्रा कमांडोच्या एका जवानाचा मृतदेह एअरलिफ्टने जगदलपूरला नेला आहे.

नेमकं काय घडलं?

>> 2 एप्रिल रोजी CoBRA, CRPF, STF और DRG ने एक संयुक्त ऑपरेशन हाती घेतलं.

>> तर्रेम, उसूर, पामेड आणि मनिपा (सुकमा) आणि नरसापूरम (सुकमा) येथून सुरक्षा दलाचे जवान या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले.

>> सुरक्षा दलाला माओवादी एकत्र जमणार असल्याची माहिती मिळाली. त्याच आधारे हे ऑपरेशन हाती घेण्यात आले.

>> 3 एप्रिल रोजी दुपारी सुकमा-बीजापूर बॉर्डवर जोनागुडा गावाजवळ माओवाद्यांनी अचानक हल्ला केला.

>> ही चकमक जिथे झाली तिथून सुरक्षा दलाचे तर्रेम शिबीर अवघ्या 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे.

>> नक्षलवाद्यांनी पाळत ठेवून हा हल्ला केला होता. 2010मध्ये ताडमेतला येथे आणि 2020मध्ये मिनपा येथे झालेल्या हल्ल्यासारखाच हा हल्ला होता.

>> हा ठरवून घेतलेला निर्णय होता. आम्ही माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात होतो. आम्ही पूर्ण तयारीनिशी गेलो होतो. ही मोठी लढाई होती, ती निकराने लढल्या गेली, असं या अभियानाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितलं.

>> माओवाद्यांच्या पीएलजीए बटालियन नंबर-1चं नेतृत्व कमांडर हिडमा करत होता. याच बटालियनने जवानांवर हल्ला केला. त्यात एकूण 180 नक्षलवादी होते. पामेड एरिया कमिटीचे नक्षलवादी पलटन, कोंटा एरिया कमिटी, जगरगुंडा आणि बासागुडा एरिया कमिटीचीही त्यांना साथ मिळाली होती. त्यामुळे या नक्षलवाद्यांची एकूण संख्या 250 झाली आहे.

>> सुरक्षा दलाचे जवान मात्र दोन किलोमीटरच्या परिसरात घेरले गेले होते. तसेच सर्व जवान एकत्र नव्हते. ही चकमक सुमारे 5 ते 6 तास चालली. म्हणजे शनिवारी 4 वाजल्यापर्यंत सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली.

>> या हल्ल्यात 9 नक्षलवादी मारले गेले आणि 12 नक्षलवादी जखमी झाल्याचा सुरक्षा दलाचा दावा आहे.

>> एका नक्षलवादी महिलेचा मृतदेहही सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चकमकीत नक्षलवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे. (story behind Naxal encounter between security forces in Chhattisgarh)

संबंधित बातम्या:

Sukma Naxal attack: धक्कादायक! नक्षलवादी हल्ल्यानंतर बेपत्ता असलेल्या 14 जवानांचे मृतदेह सापडले

छत्तीसगडमध्ये चकमक, 15 नक्षलवादी ठार, 5 जवान शहीद, 21 गायब

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 15 जवान बेपत्ता

(story behind Naxal encounter between security forces in Chhattisgarh)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.