मोठी बातमी! फुफ्फुसाच्या इन्फेक्शनमुळे सुप्रीम कोर्टाचे जज एम.शांतनगौदर यांचं निधन

फुफ्फुसात संसर्ग झाल्याने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मोहन एम. शांतनगौदर यांचा मृत्यू झाला आहे. (Supreme Court Judge Justice Mohan M Shantanagoudar Dies At Gurgaon Hospital)

मोठी बातमी! फुफ्फुसाच्या इन्फेक्शनमुळे सुप्रीम कोर्टाचे जज एम.शांतनगौदर यांचं निधन
Mohan M Shantanagoudar
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 8:36 AM

नवी दिल्ली: फुफ्फुसात संसर्ग झाल्याने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मोहन एम. शांतनगौदर यांचा मृत्यू झाला आहे. वयाच्या 62व्या वर्षी शांदनगौदर यांनी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांना कोरोना झाला होता की नाही, हे अद्याप कन्फर्म झालेलं नाही. (Supreme Court Judge Justice Mohan M Shantanagoudar Dies At Gurgaon Hospital)

शांतनगौदर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्रीपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, रात्री उशिरा अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांचं निधन झालं. त्याच्या निधनावर वकील आणि न्यायाधीशांनी शोक व्यक्त केला आहे.

वकील ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

17 फेब्रुवारी 2017मध्ये शांतनगौदर यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी पदोन्नती मिळाली होती. शांतनगौदर यांचा जन्म 5 मे 1958 रोजी कर्नाटकात झाला होता. 1980मध्ये एक वकील म्हणून त्यांनी स्वत:ला सिद्ध केलं होतं. त्यांची नामांकित वकिलांमध्ये गणती होऊ लागली. त्यानंतर 2003मध्ये कर्नाटक हायकोर्टात अॅडिशनल जज म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सप्टेंबर 2004मध्ये त्यांना परमनंट जज म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यानंतर त्यांची केरळ उच्च न्यायालयात बदली झाली. 1 ऑगस्ट 2016मध्ये त्यांनी कार्यवाहक चीफ जस्टिस म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर 22 सप्टेंबर 2016मध्ये ते केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले. 2017मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली होती. देशात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. (Supreme Court Judge Justice Mohan M Shantanagoudar Dies At Gurgaon Hospital)

संबंधित बातम्या:

कोरोना परिस्थिती हाताळण्यावरुन मोदींवर टीका, केंद्राच्या मागणीनंतर अनेक ट्विट्स हटवले

कोविशील्ड पाठोपाठ कोव्हॅक्सिन लसीचे दर ठरले; राज्यांना 600 रुपयांत, तर खाजगी रुग्णालयांना 1200 रुपयांत मिळणार

कंगना म्हणाली मोदी हेच देश आहेत, निवृत्त IAS अधिकाऱ्याने ट्विटरवरच क्विनचा क्लास घेतला

(Supreme Court Judge Justice Mohan M Shantanagoudar Dies At Gurgaon Hospital)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.