पेगसस प्रकरणातील आरोप गंभीर, सत्य बाहेर यायला हवं : सर्वोच्च न्यायालय

इस्राईलच्या पेगसस स्पायवेअरचा वापर करुन हेरगिरी केल्याचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने पेगसस प्रकरणातील आरोप गंभीर असल्याचं म्हणत यातील सत्य समोर यायल हवं असं मत नोंदवलं आहे.

पेगसस प्रकरणातील आरोप गंभीर, सत्य बाहेर यायला हवं : सर्वोच्च न्यायालय
supreme court
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 9:51 AM

नवी दिल्ली : इस्राईलच्या पेगसस स्पायवेअरचा वापर करुन हेरगिरी केल्याचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचलं आहे. या प्रकरणी दाखल याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने पेगसस प्रकरणातील आरोप गंभीर असल्याचं म्हणत यातील सत्य समोर यायल हवं असं मत नोंदवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (5 ऑगस्ट) 9 याचिकांवर सुनावणी केली. सरन्यायाधीश ए. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण म्हणाले, “पेगसस प्रकरणातील आरोप गंभीर आहेत यात कोणतीही शंका नाही. या प्रकरणातील सत्य समोर यायला हवं. या फोन टॅपिंगमध्ये कुणाची नावं आहेत याविषयी आपल्याला कोणतीही माहिती नाही.

पेगसस प्रकरणी सरन्यायाधीशांचे 2 प्रश्न

यावेळी सरन्यायाधीशांनी दोन प्रश्नही उपस्थित केले. व्यक्तिगतपणे जे पीडित याचिकाकर्ते आहेत त्यांनी या प्रकरणी तक्रार दाखल का केली नाही? पेगसस प्रकरण 2019 मध्ये समोर आलं होतं, मग याचिकाकर्ते आत्ताच याचिका का दाखल करत आहेत? असे दोन प्रश्न रमण यांनी विचारले.

सरन्यायाधीशांच्या प्रश्नांना याचिकाकर्त्यांची उत्तरं

ज्येष्ठ पत्रकार ए. राम आणि शशी कुमार यांच्यावतीने बाजू मांडणाऱ्या अॅड. कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीशांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. ते म्हणाले, “पेगसस आपली सेवा केवळ सरकारांना देते. त्यामुळे कोणत्याही एकट्या व्यक्तीला याबाबतची माहिती मिळवण्याचं साधन उपलब्ध नाही. 2019 मध्ये या प्रकरणात नेमकी कुणाची हेरगिरी करण्यात आली याची माहिती समोर आली नव्हती. ती आत्ता 2021 मध्ये समोर आली आहे. त्यामुळेच या प्रकरणी आत्ता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत.”

यावेळी सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाला व्हॉट्सअॅपने पेगसस निर्मात्या एनएसओ या इस्राईल कंपनीविरोधात सुरू केलेल्या कारवाईबाबतही माहिती दिली. तसेच या प्रकरणी सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली.

“सामाजिक कार्यकर्ते, नेते, वकील, संवैधानिक पदांवरील व्यक्तींवर पाळत”

सिब्बल सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना म्हणाले, “पेगससद्वारे झालेल्या हेरगिरीत न्यायालयातील न्यायमूर्ती आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पेगससचा वापर करुन सामाजिक कार्यकर्ते, नेते, वकील, संवैधानिक पदांवरील व्यक्ती अशा अनेकांवर पाळत ठेवली जात आहे.”

हेही वाचा :

संसदेतील गोंधळाचे खापर विरोधकांवर फोडून तुमच्या ‘त्या’ लोकशाहीचे श्राद्धच घाला, सामनातून केंद्र सरकारवर हल्लाबोल

‘पेगॅसस’ची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं, सामनातून केंद्रावर टीका

पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा : नाना पटोले

व्हिडीओ पाहा :

Supreme Court say allegations in Pegasus Spyware is serious truth must come out

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.