PUBG murder: जन्मदात्या बापानेच मुलाकडून बायकोच्या हत्येचा कट रचल्याचा संशय, ‘पप्पांशी दररोज बोलतोय, पुढे काय होणार माहित्येय’ मुलाने धक्कादायक बाबी सांगितल्या..

या प्रकरणात आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीच्या आधारे, साधना यांच्या हत्येचा कट रचण्यात आला आणि त्यात या मुलाचा वापर करण्यात आला, असेच प्राथमिक पातळीवर दिसते आहे. पोलिसांच्या कारवाईपासून ते कुटुंबात काय चर्चा सुरु आहे, याची इत्थंभूत माहिती या मुलाला अटकेत असतानाही आहे.

PUBG murder: जन्मदात्या बापानेच मुलाकडून बायकोच्या हत्येचा कट रचल्याचा संशय, 'पप्पांशी दररोज बोलतोय, पुढे काय होणार माहित्येय' मुलाने धक्कादायक बाबी सांगितल्या..
PUBG case father suspectImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 4:29 PM

लखनौ– ‘इथे हॉस्पिटलमध्ये काम करणारे एक अंकल माझ्या पप्पांचे मित्र आहेत. ते मला पप्पांना फोन लावून देतात, पप्पा मला सगळे सांगत असतात.’ बाल सुधारगृहात कौन्सिलिंगच्या वेळी आपल्या आईची हत्या करणाऱ्या 16वर्षांच्या मुलाने (son killed mother)हादरवणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत. आता कौन्सिंलिंगनंतर या प्रकरणात संशयाची सुई या मुलाच्या वडिलांकडे (Suspicion on the father) गेली आहे. स्वताच्या आईची हत्या कर, असे या पित्यानेच 16वर्षांच्या मुलाला उकसवले असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आहे. आईची हत्या करणाऱ्या या 16वर्षांच्या आरोपीची रवानगी त्यानंतर बाल सुधारगृहात (remand home) करण्यात आली आहे. मात्र त्याला बालसुधारगृहातही बाहेर काय घडते आहे, याची इत्थंभूत माहिती असल्याचे समोर आले आहे.

पुढे काय होणार, हे माहिती आहे- आरोपी मुलगा

बाहेर काय सुरु आहे, हे तुला कसे कळते आहे, असा प्रश्न बालसुधार गृहात असलेल्या या 16वर्षांच्या आरोपीला विचारण्यात आला. त्यावेळी या मुलाने उत्तर दिले की, पप्पांशी माझे इथूनही बोलणे होते आहे, पुढे काय होणार हे मला माहित आहे. आता बालसुधारगृहात या आरोपीचे कौन्सिलिंग करणाऱ्या टीमने जो रिपोर्ट तयार केला आहे, त्यात वडील नवीन यांनी उकसवले म्हणूनच या मुलाने आई साधनाची गोळी मारुन हत्या केल्याचे, असे नमूद करण्यात आले आहे.

जे करायचे होते, ते कले- आरोपी

मुलाने या टीमला कौन्सिलिंगमध्ये सांगितले की- मला जे करायचे होते, ते मी केले. आता कुटुंबात सुरु असलेली चर्चा, माध्यमांत येत असलेल्या बातम्या आणि पलिसांची कारवाई याने काहीही फरक पडणार नाही. आरोपी मुलाचे हे उत्तर ऐकून कौन्सिलरही हैराण झाले. या मुलाला अटक केल्यानंतर, न्यूज चॅनेल्स आणि वृत्तपत्रांपासून दूर ठेवण्यात आले आहे. तरीही त्याला या सगळ्याची माहिती असल्याने त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

हे सुद्धा वाचा

फोनप्रकरणी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याविरोधात तक्रार

दररोज या आरोपी मुलाचे त्याच्या वडिलांशी होत असलेले बोलणे, ज्या कर्मचाऱ्यामुळे होत होते, त्याच्याविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. आता या कर्मचाऱ्याची चौकशी करण्यात येणार असून, त्याचे कॉल डिलेट्स तपासले जाणार आहेत.

साधना यांना मारण्याचा होता कट

या प्रकरणात आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीच्या आधारे, साधना यांच्या हत्येचा कट रचण्यात आला आणि त्यात या मुलाचा वापर करण्यात आला, असेच प्राथमिक पातळीवर दिसते आहे. पोलिसांच्या कारवाईपासून ते कुटुंबात काय चर्चा सुरु आहे, याची इत्थंभूत माहिती या मुलाला अटकेत असतानाही आहे.

लहान मुलांपासून दूर कॅमेराच्या नजरेत आरोपी

16वर्षांच्या वयात आपल्या आईचा खून करणाऱ्या या आरोपीला बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. मात्र तिथे असलेल्या मुलांनाही त्याच्यापासून धोका होण्याची शक्यता असल्याने, त्याला लहान मुलांपा,सून लंब ठेवण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी त्य़ाच्यावर सातत्याने नजर ठेवण्यात येते आहे. या बालसुधारगृहात एकूण 120मुले आहेत. लहान मुलांची व्यवस्था तळ मजल्यावर तर 15वर्षांवरील मुलांची व्यवस्थआ पहिल्या मजल्यावर आहे. या आरोपीला तळ मजल्यावरच या लहान मुलांपासून लांब अंतरावर ठेवण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.