Tamil Nadu Fishermen : श्रीलंका नौसेनेकडून 55 भारतीय मच्छिमारांना अटक, 6 नौकाही जप्त
श्रीलंकन नौसेनेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार 18 डिसेंबर 2021 रोजी रात्री जाफनाच्या डेल्फ्ट बेटाच्या दक्षिण-पूर्व समुद्री क्षेत्रात नौसेनेनं केलेल्या एका विशेष मोहिमेदरम्यान श्रीलंकेच्या समुद्री क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या 6 भारतीय नौका जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात 55 भारतीय मच्छिमार होते.
नवी दिल्ली : श्रीलंकेच्या नौसेनेनं (ShriLanka Navy) अवैध मच्छिमारीच्या आरोपाखाली 55 भारतीय मच्छिमारांना (Fishermen) अटक केली आहे. यासह मच्छिमारांच्या 6 नौकाही श्रीलंकेकडून जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत तामिळनाडू सरकारनं (Tamil Nadu Government) रविवारी अधिकृत माहिती दिली आहे. तर याबाबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन (M. K. Stalin) यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
श्रीलंकेच्या नौसेनेनं शनिवारी जाफनामध्ये डेल्फ्ट बेटाच्या दक्षिण पूर्व समुद्री क्षेत्रातून या मच्छिमारांना अटक केली आहे. श्रीलंकन नौसेनेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार 18 डिसेंबर 2021 रोजी रात्री जाफनाच्या डेल्फ्ट बेटाच्या दक्षिण-पूर्व समुद्री क्षेत्रात नौसेनेनं केलेल्या एका विशेष मोहिमेदरम्यान श्रीलंकेच्या समुद्री क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या 6 भारतीय नौका जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात 55 भारतीय मच्छिमार होते.
श्रीलंकेच्या समुद्री क्षेत्रात मासेमारी केल्यानं अटक
उत्तरी नौसेना कमानशी जोडलेल्या फास्ट अटॅक क्राफ्ट फ्लोटिलाच्या फास्ट अटॅक क्राफ्टने ही अटक केली आहे. तसंच या कारवाई दरम्यान कोरोना नियमावली पाळली गेल्याचंही सांगण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेल्या मच्छिमारांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यानंतर कायदेशीर कारवाईसाठी त्यांना संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपवण्याची व्यवस्था करण्यात आली.
दरम्यान, दोन्ही देशांचे अनेक मच्छिमारांना एकमेकांच्या समुद्री श्रेत्रात मासेमारी करताना अटक केली जाते. भारत आणि श्रीलंकेकडून अनेकदा अशा स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, मच्छिमारांचा हा मुद्दा हा द्विपक्षीय संबंधांबाबत मुख्य अडचण बनला आहे.
एम. के. स्टालिन यांचं परराष्ट्र मंत्र्यांना पत्र
श्रीलंकन नौसेनं केलेल्या या कारवाईनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहिलं आहे. श्रीलंकेच्या नौदलानं तामिळनाडूच्या मच्छिमारांना पकडल्याच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. श्रीलंकेच्या ताब्यात असलेले भारतीय मच्छिमार आणि मासेमारी नौकांची तात्काळ मुक्तता करण्याची विनंतीही केल्याचं स्टालिन यांनी सांगितलं.
Tamil Nadu CM MK Stalin writes to EAM Dr S Jaishankar requesting his intervention in the matter of apprehension of 2 Tamil Nadu fishermen by Sri Lankan Navy in last 24 hours, requests him to secure the immediate release of Indian fishermen & fishing boats in Sri Lanka’s custody pic.twitter.com/vlZjVqJels
— ANI (@ANI) December 19, 2021
इतर बातम्या :