भावी नवऱ्याने कानाखाली मारली, मुलीने चुलत भावासोबत केलं लग्न, भर मांडवात इतका टोकाचा वाद कशावरुन झाला?
एका प्रख्यात उद्योजकाच्या मुलीने (Bride) क्षणात लग्न मोडून दुसऱ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
चेन्नई: भर मांडवात हुंडा किंवा मानपान नाट्यावरुन लग्न मोडल्याच्या (Marriage Break) अनेक घटना आपण ऐकल्या आहेत. काही वेळा लग्न मंडपातच वधू-वर पक्षांमध्ये हाणामारी होण्याचे प्रकार सुद्धा घडले आहेत. लग्न घटिका समीप आलेली असताना, लग्न मोडण्याला बहुतांशवेळा नवरदेवाचा (Groom) स्वभाव, वर्तन कारणीभूत ठरलय. अशीच एक घटना तामिळनाडूच्या कुड्डलोर जिल्ह्यात पानरुती येथे घडली. भावी नवरदेवाचं चुकीच वर्तन खपवून न घेता एका प्रख्यात उद्योजकाच्या मुलीने (Bride) क्षणात लग्न मोडून दुसऱ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. या मुलीचं स्वत:च ब्युटीसलून आहे. या मुलीचा साखरपुडा झाला होता. 20 जानेवारीला एका खासगी हॉलमध्ये विवाह समारंभ पार पडणार होता.
लग्न का मोडलं? 20 तारखेला लग्न होतं. 19 जानेवारीला लग्नाचे विधी होते. मुलगी हॉलमध्ये आल्यानंतर ती तिच्या नातेवाईकांसोबत नृत्य करत होती. भारतीय विवाहसंस्थेमध्ये अशा प्रकारे लग्नाचा आनंद साजरा केला जातो. लग्न होणार म्हणून मुलगी आनंदात होती. ती आपल्या नातेवाईकांसोबत नाचत होती. तितक्यात तिथे भावी नवरदेव आला. नवरी मुलीचं नृत्य करणं त्याला आवडलं नाही. त्याने तिथेच वाद घातला. हा शाब्दीक वाद पुढे इतका वाढत गेला की, त्याने नवरी मुलीच्या कानाखाली मारली. नवरी मुलगी सुद्धा शांत बसणारी नव्हती. तिने सुद्धा नवरदेवाच्या उलटी ठेवून दिली. न्यूज 18 ने हे वृत्त दिलं आहे.
आताच्या आता हॉलवरुन निघून जा नवरी मुलीच्या वडिलांच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडला. ते चांगलेच संतापले. त्यांनी नवरदेवाला आणि त्याच्या कुटुंबाला लग्नाच्या हॉलवरुन निघून जाण्यास सांगितले. मुलीवर हात उचलणारा असा जावई आपल्या मान्य नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर नवरी मुलीच्या वडिलांनी नातेवाईकांबरोबर चर्चा केली व नात्यातीलच चुलत भावासोबत लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. नवरी मुलीने वडिलांचा हा प्रस्ताव मान्य केला व ठरलेल्या दिवशी 20 जानेवारीला पानरुती येथील मंदिरात लग्न केले.
Tamil Nadu Woman Marries Cousin After Groom Slaps Her for Dancing at Wedding Function