National Film Awards: नॅशनल फिल्म अवॉर्ड्समध्ये तान्हाजीची बाजी, लोकप्रिय हिंदी सिनेमासह, अजय देवगणला बेस्ट एक्टर अवॉर्ड जाहीर
छत्रपती शिवाजी महाराजांसोबत स्वराज्यासाठी लढणाऱ्या आणि कोंढाणा किल्ला स्वराज्यात आणण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये वर्चस्व गाजवले आहे.
नवी दिल्ली – 68 व्या नॅशनल फिल्म अवॉर्डमध्ये (National Film Awards) ‘तान्हाजी, द अनसंग वॉरियर’ (Tanhaji-the Unsung warier)या सिनेमाने बाजी मारली आहे. लोकप्रिय हिंदी सिनेमाचा अवॉर्ड तान्हाजीला जाहीर झाला आहे. तसेच या चित्रपटात नायकाची भूमिका केलेल्या अजय देवगण याला बेस्ट एक्टर (Ajay Devgan)पुरस्काराने नावाजण्यात आलेले आहे. अजय देवगणसोबतच दक्षिणेकडील अभिनेता सूर्या याला ‘सोरारई पोटरु’ या सिनेमासाठी बेस्ट एक्टरचा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. तसेच सूर्या याच्या ‘सोरारई पोटरु’ या सिनेमाला ऑल टाईम एन्टरटेनिंग सिनेमाचाही अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. बेस्ट हिंदी सिनेमाचा अवार्ड तुलसीदास ज्युनियरला देण्यात आला आहे.
तान्हाजी- द अनसंग वॉरियर मारली बाजी
छत्रपती शिवाजी महाराजांसोबत स्वराज्यासाठी लढणाऱ्या आणि कोंढाणा किल्ला स्वराज्यात आणण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये वर्चस्व गाजवले आहे. तान्हाजीच्या पराक्रमाचा पट या चित्रपाटतून उलगडण्यात आला होता. याच तान्हाजी मालुसरे यांची भूमिका केलेल्या अजय देवगणला बेस्ट एक्टरचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर तान्हाजी हा लोकप्रिय हिंदी सिनेमाही ठरला आहे.
‘सोरारई पोटरु’ या सिनेमात सामान्य व्यक्ती आकाशात झेप घेण्याची कथा
सोरारई पोटरु या सिनेमातून एका सामान्य व्यक्तीची कथा चितारण्यात आली आहे. हा व्यक्ती आपल्या कुटुंबाच्या, मित्रांच्या आणि जिददीच्या मदतीने जगातील सर्वात मोठी इंडस्ट्री आपल्या नावे करुन दाखवतो. तामिळमधील हा सिनेमा ब्लॉकब्लास्टर हिट ठरला होता. इतकेच नाही तर हॉलिवूडच्या गोल्डन ग्लोब्स पुरस्कार सोहळ्यात बेस्ट फॉरेन फिल्म कॅटेरगरीत याचा समावेश करण्यात आला होता. या सिनेमाची कथा कॅप्टन गोपीनाथ यांच्या चरित्रावर आधारित आहे.
राजीव कपूर याचा अखेरचा सिनेमा तुलसीदार ज्युनियर
तुलसीदास जुनियर हा एक स्पोर्ट्स ड्रामा फिल्म आहे. यात एक १३ वर्षांच्या मुलाची कहाणी दाखवण्यात आलेली आहे. स्नूकर खेळात या मुलगा आपल्या वडिलांच्या पराभवाचा कसा बदला घेतो, हे दाखवण्यात आले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन मृदुल दुप्ता यांनी केले आहे. यात संजय दत्त, राजीव कपूर आणि वरुण बुद्धदेव यांच्या प्रमूख भूमिका आहेत.
कुणाला कोणते अवॉर्ड्स
बेस्ट एक्टर – अजय देवगण (तान्हाजी), सूर्या (सोरारई पोटरु) बेस्ट हिंदी फिल्म – तुलसीदास (आशुतोष गोवारीकर) बेस्ट पॉप्युलर फिल्म – तान्हाजी – द अनसंग हिरो बेस्ट फिचर फिल्म – सोरारई पोरु (तामिळ) बेस्ट एक्ट्रेस – अपर्णा बालमुरली (सोरारई पोटरु) बेस्ट गीतकार– मनोज मुन्तशिर (सायना) बेस्ट बुक ऑन सिनेमा– द लॉन्गेस्ट किस- लेखक किश्वर देसाई बेस्ट म्युझिक डायरेक्शन – विशाल भारद्वाज (1232 किलोमीटर)