मुलीला वर्गात रागवल्या म्हणून शिक्षिकेला निर्वस्त्र करुन मारहाण, 200 जणांचा जमाव आला शाळेवर चालून, 35 जणांविरोधात FIR

ज्या विद्यार्थिनीला शिक्षिकेने रागवले होते ती मुलगी इयत्ता ९वीच्या वर्गात शिकत आहे. तीन दिवसांपूर्वी या मुलीला शिक्षिकेने रागवले होते, त्याचा राग या समुदायातील लोकांनी अशा प्रकाराने काढला. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी या विद्यार्थिनीच्या घरातील काही सदस्य इतर काही सहकाऱ्यांसोबत शाळेत घुसले. त्यांनी शिक्षिकेला शिवीगाळ केली. शिक्षिकेने विरोध केल्यानंतर तिला निर्वस्त्र करण्यात आले.

मुलीला वर्गात रागवल्या म्हणून शिक्षिकेला निर्वस्त्र करुन मारहाण, 200 जणांचा जमाव आला शाळेवर चालून, 35 जणांविरोधात FIR
शिक्षिकेला निर्वस्त्र करुन मारहाण Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 4:16 PM

कोलकाता – एका मुलीला रागवल्यावरुन एका शिक्षिकेला (Teacher beaten)भयानक अपमानाला सामोरे जाण्याची घटना घडली आहे. मुलीचा कान पकडला म्हणून, एका समुदायाच्या लोकांनी शाळेत जाऊन या शिक्षिकेला मारहाण केली, एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी या शिक्षिकेला निर्वस्त्रही केले. या चिडलेल्या लोकांनी शाळेत घुसून थेट या शिक्षिकेला मारहाण करण्यास सुरुवात केली. बराच वेळ हा गोँधळ शाळेत सुरु होता. यातील चार जणांना (4 arrested)पोलिसांनी अटक केली असून, 35  जणांविरोधात एफआय़आर दाखल करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील (W. Bangal)दक्षिण दिनाजपूर येथे हा प्रकार घडला आहे. ही मुलगी अल्पसंख्याक समाजातील होती, असे सांगण्यात येते आहे. हिली ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या त्रिमोहिनी प्रतापचंद्र हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला. ज्या विद्यार्थिनीला शिक्षिकेने रागवले होते ती मुलगी इयत्ता 9 वीच्या वर्गात शिकत आहे. तीन दिवसांपूर्वी या मुलीला शिक्षिकेने रागवले होते, त्याचा राग या समुदायातील लोकांनी अशा प्रकाराने काढला. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी या विद्यार्थिनीच्या घरातील काही सदस्य इतर काही सहकाऱ्यांसोबत शाळेत घुसले. त्यांनी शिक्षिकेला शिवीगाळ केली. शिक्षिकेने विरोध केल्यानंतर तिला निर्वस्त्र करण्यात आले. त्यानंतर तिला मारहाणही करण्यात आली. याबाबतची तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी याबाबत पावले उचलली आहेत.

शिक्षिकेला मारहाणीनंतर विरोध प्रदर्शन

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. महिला शिक्षिकेसोबत घडलेल्या या प्रकारानंतर स्थानिक नागरिकांचा संतपातही व्यक्त झाला आहे. नागरिकांनी रस्त्यावर उतरुन या कृतीचा विरोध केला आहे. दोषींविरोधात कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणापूर्वी मुलीला केवळ कानाला खेचून रागवली होती, अशी माहिती या महिला शिक्षिकेने दिली आहे. अशी घटना यपूर्वी कधीही घडली नसल्याचेही या महिला शिक्षिकेने सांगितले आहे. आता आपल्याला भीती वाटत असल्याचेही तिने सांगितले.

भाजपा खासदाराने पोलिसांवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

या प्रकरणात शिक्षिकेविरोधात मारपीट करणाऱ्यांना आणि अयोग्य वागणूक देणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी स्थानिक भाजपा खासदार सुकांत मुजुमदार यांनी केली आहे. आपणही एक शिक्षक होतो, असे मुजुमदार यांनी सांगितले आहे. इथे शिक्षिकेने कान पकडला म्हणून लगेच यांचा हिजाब उतरला जातो. एवढ्या छोट्याशा प्रकरणात त्या मुलीच्या परिवारासह 200 जण थेट शाळेवर हल्ला करतात, हे अयोग्य आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी या प्रकरणात गुन्हाही दाखल केला नाही, याचे आश्चर्य वाटत असल्याचेही खासदार म्हणाले. पोलिसांनाही याचे गांभिर्य वाटले नाही. नागरिक रस्त्यावर उतरल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली, हे आश्चर्यकारक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.