तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अख्ख्या मंत्रिमंडळासह दोन दिवस महाराष्ट्रात; मोठ्या राजकीय उलथापालथी होणार?

बीआरएस पक्षाचे सर्वेसर्वा आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे. त्यांचा हा दौरा दोन दिवसाचा असणार आहे. यावेळी राज्यात अनेक राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अख्ख्या मंत्रिमंडळासह दोन दिवस महाराष्ट्रात; मोठ्या राजकीय उलथापालथी होणार?
K Chandrasekhar Rao Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 10:12 AM

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रावर संपूर्ण लक्ष केंद्रीत केलं आहे. तेलंगणात सत्ता आल्यानंतर आता महाराष्ट्रात आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न चंद्रशेखर राव यांनी सुरू केला आहे. राज्यातील काही नेते चंद्रशेओखर राव यांच्या गळालाही लागेल आहेत. मात्र, त्यांना अजूनही राज्यातील म्हणावा तसा मोठा नेता मिळालेला नाही. या संपूर्ण पार्श्वभूमीवर चंद्रशेखर राव आज दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे. त्यांचं अख्ख मंत्रिमंडळच महाराष्ट्रात येणार आहे. चंद्रशेखर राव राज्यात मोठं शक्तीप्रदर्शन करणार असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

चंद्रशेखर राव थोड्याच वेळात तेलंगणातून महाराष्ट्राकडे यायला निघणार आहेत. ते आज आणि उद्या 27 जून रोजी महाराष्ट्रात राहणार आहेत. तेलंगणातून ते थेट उमरग्याला येणार आहेत. त्यानंतर सोलापूरला रवाना होणार आहेत. आज ते पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची पूजा करणार आहेत. यावेळी चंद्रशेखर राव विठ्ठलावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

असा असेल दौरा

चंद्रशेखर राव सकाळी 10 वाजता हैदराबादहून महाराष्ट्राकडे जायला निघतील. त्यांच्यासोबत त्यांचं अख्ख मंत्रिमंडळ असणार आहे. अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि इतर समित्यांचे अध्यक्ष, पदाधिकारीही असणार आहे. चंद्रशेखर राव हे बाय रोड येणार आहेत. हेलिकॉप्टर किंवा विमानाने येणार नाहीत. ते थेट पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. नंतर तुळजापूरला जाऊन तुळजा भवानीचं दर्शन घेणार आहेत. हस्तमाग व्यवसायिकांशीही ते संवाद साधणार आहे. त्यांचा रात्रीचा मुक्काम सोलापुरातच असणार आहे. राव यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

भालके यांचा प्रवेश

त्यानंतर ते सोलापुरातील सरकोली गावात जाऊन एका कार्यक्रमात भाग घेणार आहेत. या दरम्यान चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत काही पक्षप्रवेशही होणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते भगिरथ भालके यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह राव यांच्या बीआरएस पार्टीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भालके आज राव यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे या प्रवेशाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पंकजा मुंडे यांना ऑफर

दरम्यान, चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पार्टीने भाजप नेत्या पंकजा मुडे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. पंकजा मुंडे पक्षात आल्यास त्यांनाच मुख्यमंत्री करू, अशी ऑफरच पंकजा मुंडे यांना देण्यात आली आहे. त्यावर पंकजा यांनी अद्याप काहीच भाष्य केलेलं नाही. त्यामुळे त्या काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.