लॉकडाऊन पूर्णपणे हटवणारं पहिलं राज्य, ‘या’ राज्याने संपूर्ण लॉकडाऊन हटवला

Telangana Unlock : तेलंगणातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने घटली आहे. त्याबाबतचा अहवाल आरोग्य विभागाने दिल्यानंतर, तेलंगणा सरकारने तिथला लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला.

लॉकडाऊन पूर्णपणे हटवणारं पहिलं राज्य,  'या' राज्याने संपूर्ण लॉकडाऊन हटवला
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 4:18 PM

हैदराबाद : तेलंगणातील के चंद्रशेखर राव (Telangana Chief Minister K. Chandrashekar Rao ) यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत तेलंगणातील लॉकडाऊन (Telangana Unlock) पूर्णपणे उठवण्यात आला आहे. उद्या म्हणजेच रविवार 20 जूनपासून तेलंगणामध्ये सर्वकाही सुरु राहील. इतकंच नाही तर तेलंगणामध्ये ना नाईट कर्फ्यू , ना वीकेंड लॉकडाऊनचे नियम असतील. सरसकट संपूर्ण लॉकडाऊन हटवण्यात आला आहे. पूर्णपणे लॉकडाऊन हटवणारं तेलंगणा हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे.

तेलंगणातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने घटली आहे. त्याबाबतचा अहवाल आरोग्य विभागाने दिल्यानंतर, तेलंगणा सरकारने तिथला लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला.

तेलंगणातील कोरोनाची सद्यस्थिती

तेलंगणामध्ये शुक्रवारी आलेल्या आकडेवारीनुसार, 1417 नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्यचे आकडा 6,10,834 इतका पोहोचला. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात असल्याचं पाहून, तेलंगणा सरकारने लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील रुग्णसंख्येत घट 

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाच्या 60,753 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर उपचार घेत असलेल्या 1,647 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. काल दिवसभरात देशातील एकूण 97,743 कोरोना (Coronavirus) रुग्ण बरे होऊ घरी परतले. बुधवारी दिवसभरात देशात कोरोनाचे 62480 कोरोना रुग्ण सापडले होते. या तुलनेत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली घट ही समाधानाची बाब मानली जात आहे.

संबंधित बातम्या  

Coronavirus in India: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट; 1,647 जणांचा मृत्यू

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.