Video अयोध्या टेंट सिटीत तुमच्या घरापेक्षा जास्त सुविधा, व्हिडिओ व्हायरल

ram mandir pran pratishtha | राम मंदिरात आज भगवान श्रीराम विराजमान होणार आहेत. तब्बल ५०० वर्षांची प्रतिक्षा संपणार आहे. लाखो भाविक अयोध्येत आले आहेत. त्यांच्या राहण्यासाठी टेंट सिटी विकसित केली गेली आहे. त्यातील सुविधा एखाद्या हॉटेलपेक्षा कमी नाही.

Video अयोध्या टेंट सिटीत तुमच्या घरापेक्षा जास्त सुविधा, व्हिडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jan 22, 2024 | 11:54 AM

अयोध्या, दि.22 जानेवारी 2024 | आयोध्या येथे होणाऱ्या राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापने निमित्ताने संपूर्ण देशभरातून हजारो भाविक आले आहेत. या भाविकांच्या निवासस्थानासाठी अयोध्येत टेंट सिटी उभारण्यात आली आहे. या टेंट सिटीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या टेंट सिटीमध्ये सर्व लग्जरी सुविधा देण्यात आल्या आहेत. एखाद्या फाईव्ह स्टार, थ्री स्टार हॉटेलसारख्या या सुविधा आहेत. तुमच्या घरात नाही, त्यापेक्षा चांगल्या सुविधा दिल्या आहेत. टेंट सिटी, बेड, सोफा, बाथरुम सर्वच असल्यामुळे याला टेंट म्हणावे की हॉटेल, असा प्रश्न निर्माण होईल.

काय आहेत सुविधा

अयोध्येतील टेंट सिटीमध्ये एक हजार टेन्टची उभारणी करण्यात आली आहे. या टेन्टमध्ये घरापेक्षा जास्त सुविधा दिल्या आहेत. टेन्टमध्ये प्रवेश करताच दोन खुर्च्या आहेत. ज्यापद्धतीने घरात हॉलमध्ये रचना असते, तशी रचना करण्यात आली. त्यानंतर आत गेल्यावर सोफा ठेवण्यात आला आहे. त्याच्याजवळ टेबल आणि डबल बेडही देण्यात आला आहे. डबल बेडवर नवीन चादीरी दिल्या आहेत. पाणी किंवा चहा करण्यासाठी इलेक्ट्रीक किटली दिली आहे. कचरा होऊ नये म्हणून डसबनी ठेवली आहे. चेंज रुम दिला आहे. वॉशरुममध्ये नवीन कमोड दिला आहे.

हे सुद्धा वाचा

8500 वर्ग मीटरमधील टेंट सिटी कोणत्याही हॉटेलपेक्षा कमी नाही. 88,000 पेक्षा जास्त भाविक या टेंटसिटीमध्ये राहू शकतात. 20 एकर जागेवर ही सिटी उभी राहिली आहे. गिझर आणि वॉश बेशिंगसोबत वॉशचे सर्व सामान आहे. हे सर्व पाहून मजा आय गया, असे या व्हायरल व्हिडिओत भाविक म्हणत आहे.

दहा हजार लोकांचे जेवण

आयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्या अनुषंगाने लाखो रामभक्त अयोध्येत दाखल होत आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था सुद्धा तितकीच चांगली केली आहे. सुरभी नावाची एक सेवाभावीसंस्था त्यासाठी काही दिवसांपासून मेहनत घेत आहेत. सरस्वती विद्यालयच्या पटांगणामध्ये दिवस-रात्र दहा हजार लोकांचं जेवण तयार केले जात आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.