Terror attack | भारतीय सैन्याच्या गाडीवर दहशतवाद्यांचा हल्ला, 3 जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या ट्रकवर हल्ला केलाय. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत. तर तीन जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Terror attack | भारतीय सैन्याच्या गाडीवर दहशतवाद्यांचा हल्ला, 3 जवान शहीद
Follow us
| Updated on: Dec 21, 2023 | 10:09 PM

श्रीनगर | 21 डिसेंबर 2023 : जम्मू-काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या ट्रकवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत. तर तीन जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. भारतीय सैन्याकडून हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे. जवान आणि दहशवाद्यांमध्ये सध्या चकमक सुरु आहे. भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांना जीवंत पकडण्याचा किंवा त्यांना कंठस्नान घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भारतीय सैन्याचा मोठा फौजफाटा घटनास्थळाकडे रवाना झाला आहे.

संबंधित घटना ही जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात घडली आहे. विशेष म्हणजे महिन्याभरातील ही दुसरी घटना आहे. हा हल्ला थानामंडी परिसरात झाला. गेल्या महिन्यात राजौरीच्या कालाकोट येथे सैन्य दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन कॅप्टन आणि जवानही शहीद झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची घटना घडली आहे.

संबंधित परिसर हा दहशतवाद्यांचा अड्डाच समजला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये या परिसरात भारतीय सैन्याच्या जवानांवर अनेकदा हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर्षी एप्रिल-मे महिन्यात राजौरी-पुंछमध्ये झालेल्या हल्ल्यात 10 जवान शहीद झाले होते. या परिसरात सातत्याने जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक होत असते. गेल्या दोन वर्षात दहशतवादविरोधी अभियानाअंतर्गत 35 पेक्षा जास्त सैनिक शहीद झाले आहेत.

Non Stop LIVE Update
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.