Marathi News National Terrorist Target Killing Murder of a Policeman 24 Hours After Kashmiri Pandit Murder Kashmiri Pandit Angry at Modi Government
दहशतवाद्यांचे टार्गेट किलिंग, काश्मिरी पंडिताच्या हत्येनंतर 24 तासांत एका पोलिसाची घरात घुसून केली हत्या, काश्मिरी पंडित मोदी सरकारवर नाराज
श्रीनगर – जम्मू काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir)90 च्या दशकात सुरु झालेल्या टार्गेट किलिंगची पुनरावृत्ती पुन्हा होताना दिसते आहे. दहशतवादी आता सैन्यदलाच्या जवानांबरोबरच, काश्मिरी पंडितांनाही (Kashmiri Pandit)लक्ष्य करु लागले आहेत. शुक्रवारी पुलवामात दहशतवाद्यांनी एका पोलिसाच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. (terrorist attack)त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला. काश्मिरात 24 तासांत हत्येची ही दुसरी घटना आहे. […]
kashmiri pandit target killingImage Credit source: ANI
श्रीनगर – जम्मू काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir)90 च्या दशकात सुरु झालेल्या टार्गेट किलिंगची पुनरावृत्ती पुन्हा होताना दिसते आहे. दहशतवादी आता सैन्यदलाच्या जवानांबरोबरच, काश्मिरी पंडितांनाही (KashmiriPandit)लक्ष्य करु लागले आहेत. शुक्रवारी पुलवामात दहशतवाद्यांनी एका पोलिसाच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. (terrorist attack)त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला. काश्मिरात 24 तासांत हत्येची ही दुसरी घटना आहे. यानंतर काश्मीर खोऱ्यात तणावाची स्थिती निर्माण झाली असून, ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत.
In Pulwama, meanwhile, cop Riyaz Ahmad Thoker’s body reaches his wailing relatives and neighbours. He was shot this morning in his village. Video @Qayoomyousfpic.twitter.com/afGsqMG7Bl
बडगाममध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी चडुरा तहसीलदार कार्यालयातील क्लार्क राहुल भट्ट यांची कार्यालयात घुसून गोळी मारुन हत्या केली होती. त्यांचाही हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर शुक्रवारी पुलवामात गुदुरामध्ये दशतवाद्यांनी एसपीओ रियाज अहमद थोकर यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. हॉस्पिटलमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आले. २४ तासांत झालेल्या या दुसऱ्या हत्येनंतर काश्मिरी पंडितांमध्ये संतापाची लाट आहे.
राहुल भट्ट यांच्या अंत्यसंस्काराला मोठी गर्दी
राहुल भट्ट यांच्या मृतदेहावर बनतालाब येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जम्मूचे मोठे अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अंत्यदरश्नासाठी पोहचलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांना नागरिकांच्या उद्रेकाचा सामना करावा लागला.
राहुल भट्ट कोण विचारले आणि मारली गोळी
राहुल भट्ट यांच्या कार्यालयात दहशतवादी पोहचले, त्यांनी त्यांचे नाव विचारले आणि त्यांना गोळी मारली, असे राहुल भट्ट यांच्या पत्नी मीनाक्षी यांनी सांगितले आहे. कुठल्यातरी कर्मचाऱ्यानेच ही माहिती दहशतवाद्यांना दिली असेल, कुठलातरी कर्मचारीच दहशतवाद्यांशी बस्तान बाँधून असेल, असा आरोपही त्यांनी केला. राहुल भट्ट गेल्या काही दिवसांपासून बदली मागत होते, मात्र त्यांचे म्हणणे कुणीही ऐकून घेतले नसल्याचेही मीनाक्षी यांनी सांगितले. राहुल यांच्या मारेकऱ्यांना दोन दिवसांत यमसदनी पाठवा, अशी विनंतीही मीनाक्षी भट्ट यांनी सैन्दलाकडे केली आहे.
जम्मू–काश्मिरात ठिकठिकाणी निदर्शने
त्यापूर्वी गुरुवारी ठिकठिकाणी या हत्येविरोधात निदर्शने करण्यात आली. राहुल भट्ट यांच्या मृतदेहासह रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. उपराज्यपालांनी या ठिकाणी यावे, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती. अखेरीस डीआयडी सुजित कुमार यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मृतदेह घरी नेण्यात आला.
Budgam, J&K | Kashmiri Pandit govt employees & their families protest against killing of Chadoora Tehsil Office employee Rahul Bhat
If the Administration can lathicharge & tear gas the public, then could they not have caught the terrorist yesterday?: Aparna Pandit, a protester pic.twitter.com/oXAB5OKo5M
सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत नोकरीवर जाणार नाही–पंडित
बडगाममध्ये जिथे हा प्रकार घडला, तिथल्या शेखापोरा पंडित कॉलनीत काश्मिती पंडितांनी निदर्शने केली. जोपर्यंत सरकारकडून सुरक्षा मिळत नाही, तोपर्यंत नोकरीवर जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे कँपमध्ये राहणाऱ्या काश्मिरी पंडितांनी रस्त्यांवर येऊन केंद्र आणि राज्य सरकारंविरोधात घोषणा दिल्या. अनेक ठिकाणी मेणबत्त्या लावून निदर्शने करण्यात आली. काश्मिरात सुरक्षित वाटत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. काश्मिरी पंडितांच्या घरवापसीचे केंद्र सरकारचे सर्व दावे फोल असल्याचा आरोपही या काश्मिरी पंडितांनी केली आहे.
कलम 370 हटवल्यानंतर 4 काश्मिरी पंडितांसह 14 हिंदूंची हत्या
काश्मिरात ऑक्टोबरपासून टार्गेट किंलिंग सुरु झाले आहे. त्यावेळी पाच दिवसांत सात नागरिक मारण्यात आले होते. त्यात एक काश्मिरी पंडित, एक शिख आणि एक प्रवासी हिंदू सामील होते. गेल्या शनिवारीही एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली. 370 कलम हटवल्य़ानंतर आत्तापर्यंत 4 काश्मिरी पंडितांसह 14 हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. गृहमंत्रालयाच्या वतीने संसदेत ही माहिती देण्यात आलीये.