काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून पुन्हा सीआरपीएफ जवानांवर गोळीबार, एक जवान शहिद
या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले. यातील एक जवान शहीद झाला. दुसरीकडे पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी मैसुमा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अशा हिंसाचारातून कोणालाही काहीही मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया मेहबुबा यांनी दिली आहे.
नवी दिल्ली : काश्मिर खोर्यात दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई तीव्र करूनही दहशतवाद्यांकडून हल्ले करण्याचे सत्र सुरूच राहिले आहे. श्रीनगरच्या मैसुमा परिसरातही दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला आहे. सोमवारी मैसुमा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफ (CRPF) जवानांना लक्ष्य करीत अंदाधुंद गोळीबार केला. यात दोन जवान गंभीर जखमी झाले. यातील एका जवानाला वीरमरण (Martyred) आले. या घटनेने काश्मिरच्या खोर्यातील दहशत आणखीन वाढले आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी कारवायांच्या मोहिमा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. (Terrorists again fire on CRPF jawans in Kashmir Valley one jawan martyred)
पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी केला हल्ल्याचा निषेध
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या मैसुमा पुल परिसरात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले. यातील एक जवान शहीद झाला. दुसरीकडे पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी मैसुमा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अशा हिंसाचारातून कोणालाही काहीही मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया मेहबुबा यांनी दिली आहे. अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांनाच त्रास होईल, असे त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी शहीदांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या.
सीआरपीएफवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर ओमर अब्दुल्ला म्हणाले की, कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानाच्या कुटुंबाप्रती माझी संवेदना आहे. जखमी जवान पूर्णपणे बरा व्हावे, यासाठी मी प्रार्थना करतो. नुकतीच दक्षिण काश्मीरमधील शोपियानमधील तुर्वांगम गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये एक दहशतवादी मारला गेला होता. जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्या कारवाईची माहिती दिली होती. दहशतवादी लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याआधारे सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केली होती. सुरक्षा दलांनी संशयित भागात शोधमोहीम तीव्र केली, तेव्हा दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. (Terrorists again fire on CRPF jawans in Kashmir Valley one jawan martyred)
इतर बातम्या
Lalu Prasad Yadav : लालूंच्या अडचणीत पुन्हा मोठी भर; जामीनावर सुप्रीम कोर्ट करणार सुनावणी
Video : गोरखनाथ मंदिरात पीएसी जवानांवर हल्ला, हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल