ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, उद्या सुनावणी?; निवडणूक आयोगाच्या निर्णयाला दिलं आव्हान

येत्या 27 तारखेपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात ठाकरे गटाला शिंदे गटाचा व्हीप लागू होणार आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती मिळावी म्हणून ठाकरे गट आग्रही आहे.

ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, उद्या सुनावणी?; निवडणूक आयोगाच्या निर्णयाला दिलं आव्हान
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 11:11 AM

नवी दिल्ली : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय चुकीचा असून त्यांनी अनेक मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. उद्या या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ठाकरे गटाच्या याचिकेत काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाचं नाव हिरावून घेण्याचा घेतलेला निर्णय लोकशाही मार्गाने घेतलेला नाही. 2018ची पक्षाची कार्यकारिणी ही पक्षाच्या घटनेप्रमाणे आहे. पक्षाचे बहुतांश सदस्य आमच्या बाजूने आहेत. निवडणूक आयोगाने केवळ आमदार आणि खासदारांच्या संख्येच्या आधारे निर्णय दिला आहे. हा निर्णय योग्य नाही, असा दावाही या याचिकेत करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

तसेच आजपर्यंत ज्या ज्या पक्षात वाद झालेत त्या पक्षांची निवडणूक चिन्हे गोठवण्यात आली. त्यानंतर ते चिन्ह इतर कोणत्याही गटाला देण्यात आलेलं नाही. या केसमध्ये मात्र चिन्ह दुसऱ्या गटाला देण्यात आलं आहे. देशाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत असल्याचंही या याचिकेच्या माध्यमातून कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्याचं सांगितलं जात आहे.

उद्यापासून सुनावणी

उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी होत आहे. त्यामुळे उद्याच्या कामकाजात या याचिकेचा समावेश करण्यात यावा आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

व्हीप लागू होऊ नये म्हणून

दरम्यान, येत्या 27 तारखेपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात ठाकरे गटाला शिंदे गटाचा व्हीप लागू होणार आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती मिळावी म्हणून ठाकरे गट आग्रही आहे. त्यामुळे कोर्ट आता काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेसाठी करो या मरो

दरम्यान. न्यायालयात पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने-सामने येणार आहे. ठाकरे गटाने याचिका दाखल केल्याने शिंदे आणि ठाकरे पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी केस सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. दरम्यान, ठाकरे गटासाठी करो, या मरोची परिस्थिती असल्याचं मत ज्येष्ठ वकिलांनी व्यक्त केलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.