सर्वात मोठी बातमी ! संसदेत घुसखोरी करणाऱ्यांचे बारा वाजणार! गंभीर आरोप; 7 दिवसांची पोलीस कोठडी
संसदेत घुसून धुडगूस घालणाऱ्यांची आता काही खैर नाही. या चारही आरोपींवर दहशतवादाचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर हे आरोप करण्यात आले. तसेच या चारही जणांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, संसदेत झालेल्या या घुसखोरी प्रकरणी आठ कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे.
नवी दिल्ली | 14 डिसेंबर 2023 : संसदेत घुसून धुडगूस घालणाऱ्यांची आता काही खैर नाही. या चारही आरोपींवर दहशतवादाचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर हे आरोप करण्यात आले. तसेच या चारही जणांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संसदेची सुरक्षा भेदून हे चार जण काल संसदेत शिरले होते. संसदेत शिरून त्यांनी त्यांनी स्मोक कँडल फोडली होती. त्यामुळे संसदेत पिवळा, लाल आणि पांढरा धूर झाला होता. या प्रकारामुळे खासदार चांगलेच हादरून गेले होते. काही खासदार तर जीव मुठीत घेऊन सभागृहाच्या बाहेरही पडले होते. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली होती.
संसद भवनात घुसखोरी करणारे नीलम, अमोल, सागर शर्मा आणि मनोरंजन यांना अटक करण्यात आली होती. या चारपैकी दोघांवर संसदेच्या आत गोंधळ घालण्याचा आणि घोषणाबाजी करण्याता आरोप ठेवण्यात आला होता. या चौघांनाही पटियाला हाऊस कोर्टचे अॅडिशनल सेशन जज-2 डॉ. हरदीप कौर यांच्या कोर्टात हजर करण्यात आलं. दिल्ली पोलिसांकडून प्रोसिक्यूटर इरफान अहमद यांनी युक्तिवाद केला. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या चौघांची 15 दिवसांची रिमांड मागितली. पण कोर्टाने 7 दिवसांची रिमांड दिली आहे. गरज पडल्यास या चारही जणांची रिमांड वाढवण्यात येणार असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.
आरोप काय?
दिल्ली पोलिसांनी या चारही आरोपींविरोधात यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. म्हणजे या चारही जणांवर दहशतवादाचा आरोप ठेवला आहे. या प्रकरणात एकूण सहा आरोपी आहेत. मात्र, फक्त पोलिसांना चारच जणांना पकडता आलं आहे. एक आरोपी विशाल कोठडीत आहे. पण सहावा आरोपी ललित झा हा फरार आहे.
8 कर्मचारी सस्पेंड
संसदेत झालेल्या या घुसखोरी प्रकरणी आठ कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे. या आठही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. अरविंद, गणेश, प्रदीप, रामपाल, विमित, नरेंद्र, अनिल आणि वीर दास असं या चौघांची नावे आहेत. या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेत प्रचंड वाढ करणअयात आली आहे. या घटनेनंतर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात आहे. चप्पल, बूट काढून तपासणी केली जात आहे. टोपीही काढायला सांगितलं जात आहे.