देशाला मिळणार पहिली प्रादेशिक जलद वाहतूक व्यवस्था, PM मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ऑक्टोबर रोजी दिल्ली-मेरठ रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टमचे उद्घाटन करतील. हा प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले आहे. दिल्ली-मेरठ RRTS ही देशातील पहिली प्रादेशिक जलद वाहतूक व्यवस्था आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिल्ली-मेरठ RRTS म्हणजेच प्रादेशिक जलद वाहतूक व्यवस्था पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. सोशल मीडियावर त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत. हा अग्रगण्य उपक्रम भारतात प्रथमच सुरू होत आहे.
हरदीप सिंग पुरी यांनी X वर लिहिले की, गरीब आणि सामान्य माणसांसाठी शहरी गतिशीलता सुधारण्यासाठी इतके महत्त्व देणारा नेता जगाने क्वचितच पाहिला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदीजींनी बीआरटीएस सुरू केली होती. शहरी वाहतुकीचे नियोजन कसे यशस्वी करून सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य व्हावे, याचे ते ज्वलंत उदाहरण आहेत.
२० तारखेला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
दिल्ली-मेरठ RRTS ही देशातील पहिली प्रादेशिक जलद वाहतूक व्यवस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ऑक्टोबरला त्याचे उद्घाटन करणार आहेत. उद्घाटनानंतर, RRTS कॉरिडॉरचा साहिबााबाद-दुहाई डेपो विभाग 21 ऑक्टोबरपासून प्रवाशांसाठी खुला होईल.
PM Sh @narendramodi Ji’s focus on urban mobility: From BRTS to RRTS. Rarely has the world seen such a leader who places so much importance on improving Urban Mobility for the poor and the common man.@PMOIndia pic.twitter.com/QCoyrCVq7L
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) October 19, 2023
RRTS चे भाडे कसे असेल?
नॅशनल कॅपिटल रिजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (NCRTC) ने जाहीर केलेल्या भाडे दरांनुसार, साहिबााबाद ते दुहाई डेपोपर्यंतच्या स्टँडर्ड क्लाससाठी प्रवाशांना 20 ते 50 रुपये मोजावे लागतील. रॅपिडएक्स ट्रेनमधील प्रीमियम क्लासचे भाडे 100 रुपये असेल., 90 सें.मी.पेक्षा कमी उंचीची मुले मोफत प्रवास करू शकतात. साहिबााबाद ते दुहई डेपोच्या अंतरानुसार प्रीमियम क्लासच्या तिकिटांची किंमत 40 ते 100 रुपये ठेवण्यात आली आहे.