थयथयाट केल्याने मेलेले परत येणार नाहीत, आम्ही काहीच करू शकत नाही; हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचं धक्कादायक विधान

हरियाणात कोरोना बळींचा आकडा वाढत असतानाच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी धक्कादायक आणि वादग्रस्त विधान केलं आहे. (The dead won’t come back, no point debating death data, says CM Manohar Lal Khattar)

थयथयाट केल्याने मेलेले परत येणार नाहीत, आम्ही काहीच करू शकत नाही; हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचं धक्कादायक विधान
CM Manohar Lal Khattar
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 5:25 PM

चंदीगड: हरियाणात कोरोना बळींचा आकडा वाढत असतानाच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी धक्कादायक आणि वादग्रस्त विधान केलं आहे. थयथयाट केल्याने मेलेले लोक परत येणार नाहीत. हे नैसर्गिक संकट आहे. आम्ही काहीच करू शकत नाही, असं धक्कादायक विधान मनोहर लाल खट्टर यांनी केलं आहे. खट्टर यांच्या या विधानामुळे संताप व्यक्त केला जात आहे. (The dead won’t come back, no point debating death data, says CM Manohar Lal Khattar)

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मनोहर लाल खट्टर रुग्णालयात आले होते. यावेळी एका पत्रकाराने त्यांना मृतांच्या आकड्यांवरून प्रश्न विचारला असता संतप्त झालेल्या खट्टर यांनी हे धक्कादायक विधान केलं. मैत्री संबंधामुळे कोरोनाच्या रुग्णांचे आकडे आम्ही मीडियाला देत असल्याचं जनसंपर्क अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. जनतेला उत्तर देण्याची आमची जबाबदारी नाही, असा सवाल या पत्रकाराने खट्टर यांना केला. त्यावर, ही वेळ आकड्यांवर लक्ष ठेवण्याची नाहीये. ज्यांचा मृत्यू झाला. ते आपल्या थयथयाटाने जिवंत होणार नाहीत. ही नैसर्गिक आपत्ती आहे. आम्ही काहीच करू शकत नाही, असं खट्टर म्हणाले.

कोरोनाची दुसरी लाट घातक, पण आम्ही सज्ज

यापूर्वी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात खट्टर सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी कोरोनाची दुसरी लाट अत्यंत घातक असल्याचं म्हटलं होतं. कोरोनाची लाट घातक असली तरी या परिस्थितीला तोंड देण्यासाठी हरियाणाची सरकार तयार आहे, असं ते म्हणाले होते. लॉकडाऊनबाबतही त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. लॉकडाऊन लावणे हा पर्याय नाही. त्यामुळे लोक अधिकच पॅनिक होतील. तसेच लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थाही डबघाईला येते, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

आरोग्य व्यवस्थेवर लक्ष देणार

राज्यातील आरोग्य सुविधांवर आम्ही लक्ष देत आहोत. आमच्याकडे पुरेसे बेड्स आणि व्हेंटिलेटर आहेत. मात्र नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन केलं पाहिजे, असं सांगतानाच चार दिवसात 5 लाख लोकांचं लसीकरण करण्याचं टार्गेट आम्ही ठेवल्याचं त्यांनी सांगितलं होतं. (The dead won’t come back, no point debating death data, says CM Manohar Lal Khattar)

संबंधित बातम्या:

गुत्ते उघडाच, मग पाहा, दारू आत, कोरोना बाहेर; दारूवाल्या आंटीचा केजरीवालांना झिंगाट सल्ला!

कोरोना संकटात आम्ही मूकदर्शक बनू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला 7 सवाल

Maharashtra Coronavirus Live Update : पुण्यात मृतांच्या आकडेवारीची लपवाछपवी? महापालिकेच्या आणि विद्यूत विभागाच्या आकडेवारीत तफावत

(The dead won’t come back, no point debating death data, says CM Manohar Lal Khattar)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.