अरे बापरे, महिला कार ड्रायव्हरने एवढ्या जोरात मारली धडक की, बाईकस्वार थेट फ्लायओव्हरवरुन पडला खाली

ऐन गर्दीच्या ठिकाणी फ्लायओव्हरवर एका महिला कारचालकाने एका बाईकस्वाराला इतक्या जोरात धडक दिली आहे की तो बाईकस्वार थेट फ्लायओव्हरवरुन खाली पडला आहे. याचा व्हिडिओ दिल्लीतील एका व्यक्तीने ट्विट केला आहे. यातून हा अपघात किती गंभीर आहे, याची कल्पना येऊ शकेल.

अरे बापरे, महिला कार ड्रायव्हरने एवढ्या जोरात मारली धडक की, बाईकस्वार थेट फ्लायओव्हरवरुन पडला खाली
Delhi accidentImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 8:40 PM

नवी दिल्ली देशातील अनेक शहरांत सध्या कशाही गाड्या चालवण्याची जणू स्पर्धाच सुरु आहे. अनेकदा सिग्नल, गर्दी याचा विचार न करता, वाहतुकीचे नियम (Traffic rules) पायदळी तुडवून आपल्याकडे रहदारी सुरु असते. प्रत्येकालाच पुढे जाण्याची घाई असते, अशा स्थितीत नियम पायदळी तुडवण्यातच सगळेच जण धन्यता मानतात. यातूनच मोठे अपघात (Accident) घडण्याची शक्यता असते. दिल्लीतही (Delhi)नेमका असाच प्रकार घडला आहे. ऐन गर्दीच्या ठिकाणी फ्लायओव्हरवर एका महिला कारचालकाने एका बाईकस्वाराला इतक्या जोरात धडक दिली आहे की तो बाईकस्वार थेट फ्लायओव्हरवरुन खाली पडला आहे. याचा व्हिडिओ दिल्लीतील एका व्यक्तीने ट्विट केला आहे. यातून हा अपघात किती गंभीर आहे, याची कल्पना येऊ शकेल.

काय आहे व्हिडीओत

दिल्लीतील एका गर्दीच्या फ्लायओव्हरवर वाहतुकीत अपघात झाल्यानंतर हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे. या व्हिडिओत धडक दिलेली कार स्पष्ट दिसते आहे, तसेच पुलाच्या एका कोपऱ्यात बाईकही पडलेली दिसते आहे. अपघात करणारी महिला चालकही या व्हिडिओत असण्याची शक्यता आहे. हा सर्व प्रकार घडल्यानंतर अतिशय घाबरलेली महिला या व्हिडिओत दिसते, तीच या कारची चालक असावी अशी शक्यता आहे. व्हिडिओत पुढे ओव्हरब्रिजच्या खालचीही दृश्य दिसतायेत. यात जोरात धडक बसल्यानंतर थेट पुलावरुन खाली पडलेला बाईकस्वार पडलेला दिसतोय. त्याच्या अवतीभवती गर्दी जमा झालेलीही दिसते आहे. पुलावरही त्या कारभोवती गर्दी जमा झालेली दिसत असून काही जण आरडाओरडा करताना दिसतायेत.

घटनेचा व्हिडीओ पाहा या ट्विटमध्ये

Delhi: A woman driving the car hits the bike so hard that the man (bike rider) falls off the flyover, not sure of he survived. Often seen relaxation being given to women in driving tests & this is the result. Hope there’s no gender bias in dealing with the offender.@dtptraffic pic.twitter.com/NYmq4Ik6YR

हे सुद्धा वाचा

— Amit Lakhani (@TheAmitLakhani) May 6, 2022

“>

दिल्लीत नेमक्या कुठल्या भागात आणि कोणत्या ओव्हरब्रिजवर हा अपघात झाल्याचे या ट्विटमधून समजत नाही, मात्र या ट्विटमध्ये प्रत्यक्षदर्शीने दिल्ली वाहतूक पोलिसांना टॅग केलेले दिसते आहे. या अपघातात ब्रिजवरुन खाली पडलेला तरुण जिवंत आहे की मृत झाला आहे, हेही कळत नाहीये. मात्र या घटनेनंतर शहरातील प्रवासही किती असुरक्षित झाला आहे, याची जाणीव सर्वांनाच होऊ शकेल.

वाहने चालवताना वेग सांभाळा, सुरक्षित प्रवास करा

अत्यंत वेगात, घाईत, दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करुन वाहने चालवण्याची खरोखरच गरज आहे का, याचा विचार सगळ्यांनीच करण्याची गरज आहे. हा व्हिडिओ जरी दिल्लीचा असला तरी इतर सगळ्याच शहरांत थोडी फार वाहतुकीची हीच परिस्थिती आहे. वाहनांची रस्त्यांवरील गर्दीही वाढलेली आहे, अशा स्थितीत नियम पाळून, सुरक्षित प्रवास करणे सगळ्यांसाठीच अत्यंत आवश्यक आहे. हाच या अपघाताच्या व्हिडिओचा सगळ्यांसाठी धडा म्हणावा लागेल.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.