Punjab Cabinet: ‘मान’ गये उस्ताद! पहिल्याच कॅबिनेटमध्ये 25 हजार पदे तात्काळ भरण्याचे आदेश; Bhagwant Mann यांचा मोठा निर्णय

भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आज दहा मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर भगवंत मान यांनी कॅबिनेटची पहिलीच बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी 25 हजार पदे तात्काळ भरण्याचा निर्णय घेतला आहे.

Punjab Cabinet: 'मान' गये उस्ताद! पहिल्याच कॅबिनेटमध्ये 25 हजार पदे तात्काळ भरण्याचे आदेश; Bhagwant Mann यांचा मोठा निर्णय
पहिल्याच कॅबिनेटमध्ये 25 हजार पदे तात्काळ भरण्याचा निर्णय; Bhagwant Mann यांचा मोठा निर्णयImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 5:06 PM

चंदीगड: भगवंत मान  (Bhagwant Mann) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची (Punjab chief minister) सूत्रे हाती घेतल्यानंतर आज दहा मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर भगवंत मान यांनी कॅबिनेटची (Cabinet meeting) पहिलीच बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी 25 हजार पदे तात्काळ भरण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमधील बोर्ड, कॉर्पोरेशन आणि सरकारी कार्यालयातील रिक्त पदे भरण्याचा आज मोठा निर्णय घेण्यता आला आहे. तसेच तीन महिन्यासाठी व्होट ऑन अकाऊंट घेण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प येत्या जून महिन्यात सादर केला जाणार आहे. कॅबिनेटने सप्लीमेंट्री ग्रँट्सलाही मंजूरी दिली आहे. तसेच पोलीस दलात दहा हजार नोकऱ्या देण्यात येणार आहे. इतर विविध विभागात 15 हजार नोकऱ्या देण्यात येणार आहेत. अवघ्या महिन्याभरातच ही नोकरभरती सुरू करण्यात येणार आहे. भगवंत मान यांनी पंजाबच्या तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. पहिल्याच कॅबिनेटमध्ये त्यांनी हे आश्वासन पूर्ण केलं आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज आपल्या मंत्रिमंडळात दहा जणांचा समावेश केला. त्यात एका महिलेचा समावेश आहे. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी पंजाब भवनमध्ये या मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. विशेष म्हणजे हे दहाही मंत्री पहिल्यांदाच आमदार बनले आहेत. या सर्वांनी पंजाबी भाषेतच शपथ घेतली. हरपाल सिंग चीमा, हरभजन सिंग, डॉ. विजय सिंगला, लाल चंद, गुरमीत सिंग मीत हेयर, कुलदीप सिंग धालीवाल, लालजीत सिंग भुल्लर, ब्रह्म शंकर जिम्पा, हरज्योत सिंग बैंस आणि डॉ. बलजीत कौर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांसहीत 18 पदे आहेत.

डॉक्टर, वकिलांचा समावेश

मान यांच्या मंत्रिमंडळात विविध क्षेत्रातील आमदार आहेत. या कॅबिनेटमध्ये दोन शेतकरी, तीन वकील, दोन डॉक्टर, एक सामाजिक कार्यकर्ता, एक इंजीनियर आदींचा समावेश आहे. मान यांनी शहीद भगतसिंग यांच्या खटकड कलां गावात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत 117 पैकी 92 जागांवर आम आदमी पार्टी विजयी झाली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी दोन विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी, दहा मंत्र्यांनी घेतली शपथ

भगवंत मान मंत्रीमंडळाचा आज शपथविधी; दहा मंत्री घेणार शपथ, सामान्य चेहऱ्यांना संधी

धक्कादायक ! बिहारमध्ये प्रेयसीला मनवण्यासाठी केलेले आत्महत्येचे नाटक बेतले जीवावर

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.