खरेखुरे टारझन, सहा अशा कहाण्या ज्यात जंगली श्वापदांनी लहान मुलांना सांभाळले
टारझन किंवा मोगलीच्या कथा आपण टीव्हीवर पाहून आश्चर्यचकित होतही असू, पण अशा खरोखरच्या सहा कहाण्या.
नवी दिल्ली- आपण नेहमी माणुसकीच्या गोष्टी करतो, पण यात आपण जनावरांना (wild animal)गृहितच धरत नाही. प्राण्यांमध्ये स्नेह, प्रेम (love, affection)असे काही नसते असेच आपण नेहमी गृहित धरलेले असते. मात्र जगात खरोखरच अशा काही घटना घडल्या आहेत, ज्यात प्राण्यांनी त्यातली जंगली प्राण्यांनी माणसांच्या लहान मुलांना वाढवले आहे. टारझन (Tarzan)किंवा मोगलीच्या कथा आपण टीव्हीवर पाहून आश्चर्यचकित होतही असू, पण अशा खरोखरच्या सहा कहाण्या.
1. माकडांनी पाच वर्षांच्या मुलीला सांभाळले
मरीना चॅपमॅन नावाची पाच वर्षांची लहानगी कोलंबियात राहत होती. त्यानंतर तिचे अपहरण करण्यात आले. खंडणीसाठी या मुलीचे अपहरण केले, मात्र त्यानंतर तिला मारण्यासाठी खंडणीखोरांनी तिला जंगलात सोडले. तिथे प्राण वाचवताना ही लहान मुलगी कैपुचिन माकडांच्या कळपात जाऊन पोहचली. त्यांचे अनुकरण ती करु लागली. त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती, त्यांचे आवाज, त्यांची भाषा हे सगळे ती शिकली. माकडांनी तिला ससे आणि पक्षी हाताने कसे पकडायचे हेही शिकवले होते. ती सुमारे पाच वर्ष या मकडांसोबत राहिली. त्यानंतर ती माणसांत परतली. शिकाऱ्यांनी जंगलात तिला माकडांच्या कळपात पाहिले, तिथून तिला उचलून एका वेश्यागृहात विकण्यात आले होते. तिथून ती पळाली. त्यानंतर तिने द गर्ल विथ नो नेम नावाचे पुस्तकही लिहले होते.
2. बकऱ्यांनी केला सांभाळ
जून 2012 ही घटना आहे. रशियातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एका मुलाला शोधून काढले, हा मुलगा एका खोलीत बकऱ्यांसोबत बंदी होता. तो बकऱ्यांसोबतच खेळत होता आणि तिथेच झोपत होता. मात्र त्याचे योग्य प्रकारे पोषण होऊ शकले न्हते. त्यामुळे इतर मुलांच्या तलनेत तो कमकुवत झाला होता. त्याला वाचवण्यात आले मात्र त्याचा आईचा शोध मात्र लागू शकला नाही. मोठ्या मुश्किलीने तो माणसांसोबत राहू लागला. तो पलंगावर न झोपता पलंगाच्या खाली झोपणे पसंत करीत असे. मोठ्या माणसांची त्याला भीती वाटत असे.
3. जंगली माजरांनी-कुत्र्यांनी सांभाळले
2009 मध्ये काही जण सायबेरियातील एका शहरातील प्लॅटवर पोहचले तर त्यांना तिथे एक पाच वर्षांची मुलगी सापडली. तिचे नाव नताशा असे होते. ती पित्यासोबत राह असली, तरी तिला वागणूक जंगली कुत्र्या-माजंराची देण्यात येत होती. ती जमिनीवर ठेवण्यात आलेल्या भांड्यात वाकून जेवत असे. तिला मानवांची भआषाही अवगत नव्हती. ती भुंकत असे. तिला सोडवल्यानंतर तिचे वडील पळून गेले, त्यानंतर तिची रवानगी अनाथालयात करण्यात आली.
4. जंगली मांजरींनी केला सांभाळ
ही घटना 2008 सालातील आहे. अर्जेंटिना पोलिसांना आठ जंगली मांजरींसोबत एक वर्षांचा मुलगा मिळाला होता. एवढ्याथँडीतही त्या मांजरींमुळे त्याचे प्राण वाचू शकले होते. या मांजरी या लहान मुलाच्या अंगावर झोपत असत. हा मुलगा मांजरींप्रमाणेच वागत आणि खात असे.
5. जंगली कुत्र्यांनी केला सांभाळ
चिलीत एका 10 वर्षांच्या मुलाने एका गुहेत जंगली कुत्र्यांसोबत दोन वर्षे घालवली. त्याच्या आई वडिलांनी त्याला सोडून दिले होते. तो जिथे राहत होता, तिथूनही तो पळाला होता. कुत्र्यांनी त्याला आपल्यात सामावून घेतले आणि ते त्याच्या जेवण्याचीही व्यवस्था करीत. त्याची सुरक्षाही जंगली कुत्रे करीत असत. त्याने कुत्रीणीने दूधही प्यायले असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ते एका कुटुंबाप्रमाणे राहत असत.
6.कोल्ह्याने सांभाळले
जंगली जनावरांनी मुलांचा सांभाळ केल्याची ही कहाणी भारतातील आहे. कमला आणि अमला यांना वुल्फ चिल्ड्रेन या नावाने ओळखले जात असे. गोदामुरीच्या जंगलात 1920 साली 3 आणि 8 वर्षांच्या या दोन मुली एका कोल्ह्यासोबत राहत होत्या. जे ए एल सिंह नावाच्या व्यक्तीने या मुलींचा शोध घेतला आणि त्यांना अनाथालयात पाठवले. हळूहळू या मुली माणसांच्या रितीभाती शिकल्या. जसजसा काळ गेला तशा या दोन्ही मुलींना घातक आजार झाले. त्यांना वाचवणाऱ्या सिंह यांना आपण यांना जंगलातच राहू द्यायला हवे होते का, असे शेवटपर्यंत वाटत राहिले.