पंतप्रधानांच्या पंजाब दौरा प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टाचा फैसला येण्याची शक्यता, काँग्रेस सरकारची अडचण होणार?

विशेष म्हणजे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आल्यानंतर, कोर्टानं केंद्र आणि राज्य सरकार अशा दोन्हींच्या चौकशीवर बंदी आणली होती आणि रिटायर्ड जजच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. त्याचाच आज फैसला येण्याची शक्यता आहे.

पंतप्रधानांच्या पंजाब दौरा प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टाचा फैसला येण्याची शक्यता, काँग्रेस सरकारची अडचण होणार?
पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्याच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात फैसल्याची शक्यता
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 7:36 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पंजाब (Panjab) दौऱ्या दरम्यान झालेला घोळ आणि त्यातून त्यांच्या जीवाला निर्माण झालेला धोका यावरुन उठवलेलं वादळावर आज महत्वाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. हा निर्णय असेल सुप्रीम कोर्टाचा. पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान पंजाब सरकार, एसपीजी आणि स्थानिक पोलीस यांच्याकडून झालेल्या चुकीचं प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आहे आणि त्याचाच निर्णय आज येण्याची शक्यता आहे. हा निर्णय पंजाबमधल्या काँग्रेस सरकारची अडचण करणारा असेल की केंद्र सरकारची याची उत्सुकता सर्वांनाच आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आल्यानंतर, कोर्टानं केंद्र आणि राज्य सरकार अशा दोन्हींच्या चौकशीवर बंदी आणली होती आणि रिटायर्ड जजच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. त्याचाच आज फैसला येण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण? 5 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबच्या फिरोजपूर दौऱ्यावर होते. तिथं पंतप्रधान मोदी एका राजकीय रॅलीला संबोधित करणार होते. आधी ठरल्याप्रमाणे मोदींनी हेलिकॉप्टरनं सभास्थळी पोहोचणे अपेक्षीत होते. पण पावसाळी वातावरणामुळे त्यात अचानक बदल झाला आणि ते बाय रोड जाण्याचा निर्णय घेतला. त्याच प्रवासात हुसैनीवालापासून 30 कि.मी. अंतरावर मोदींच्या गाड्यांचा ताफा थांबवावा लागला आणि त्याला कारण होतं ते स्थानिकांनी चालवलेलं आंदोलन. ह्या आंदोलकांनी मोदींचा रस्ता ब्लॉक केला. वीस मिनिटांपर्यंत ताफा एका पुलावरच थांबून राहिला. शेवटी मोदी नाईलाजास्तव दौरा अर्धवट सोडून भटिंडा एअरपोर्टवर पोहोचले. दिल्लीला बसण्यापूर्वी त्यांना स्थानिक अधिकाऱ्यांना, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, त्यांच्यामुळे मी जीवंत परतलो अशा आशयाचं वक्तव्य केलं. ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. परिणामी पंतप्रधानांच्या सुरक्षेत ही मोठी चूक असल्याचं लक्षात आलं. त्यावरुन काँग्रेस आणि भाजप तसच केंद्र आणि पंजाब सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले. शेवटी प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे.

केंद्र सरकारची कोर्टात भूमिका काय? सुप्रीम कोर्टात हे प्रकरण आलं त्यावेळेस राज्य तसच केंद्र सरकारकडून स्वतंत्र चौकशी सुरु होती. कोर्टानं ह्या दोन्ही चौकशी थांबवली आणि निवृत्त न्यायधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमली. ह्या चौकशी समितीत चंदीगडचे डीजीपी, एनआयएचे आयजी, पंजाबचे एडीजीपी (सुरक्षा) तसच पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल यांचा समावेश आहे. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची माहिती पंजाबच्या चन्नी सरकारला आधीपासूनच होती. त्यासाठी त्यांनी एसपीजी कायदा तसच ब्लू बूकची माहितीही कोर्टात दिली. त्याच आधारावर मेहता म्हणाले की, ह्यात कुठलीच शंका नाही की, प्रोसेसमध्ये काही तरी घोटाळा झालाय. यावर वादच होऊ शकत नाही. पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झालीय हे वास्तव अमान्य करताच येत नाही. ब्लू बुकमध्ये हे स्पष्ट लिहिलंय की, पंतप्रधानांच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी ही पोलीस महानिर्देशकांच्या देखरेखीखाली स्थानिक पोलीस करतात.

हे सुद्धा वाचा:

I am Not Done Yet | कपिल शर्माने पुन्हा एकदा घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची फिरकी, म्हणाला….

PM Narendra Modi | काशी विश्वनाथ मंदिरातील कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची अनोखी भेट, दिलं ‘हे’ खास गिफ्ट

PM Modi On Corona | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यांना सूचना -tv9

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.