मोठी बातमी! श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर अतिरेक्यांचा हल्ला; दोन जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अतिरेक्यांनी डोकं वर काढलं आहे. (Three CRPF personnel injured in militant attack on outskirts of Srinagar)

मोठी बातमी! श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर अतिरेक्यांचा हल्ला; दोन जवान शहीद
Terrorists attack
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 4:49 PM

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अतिरेक्यांनी डोकं वर काढलं आहे. श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर अतिरेक्यांनी मोठा हल्ला केला आहे. हा हल्ला श्रीनगरच्या लवेपोरा येथे करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले असून दोन जवान जखमी झाले आहेत. या जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Three CRPF personnel injured in militant attack on outskirts of Srinagar)

लावापोरा येथे आज दुपारी अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर हल्ला केला. त्यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले तर दोन जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर लवेपोरा येथे प्रचंड घबराट पसरली असून तणावाची परिस्थिती आहे. या हल्ल्यानंतर जवानांनी संपूर्ण परिसराची घेराबंदी केली असून अतिरेक्यांचा शोध घेत आहेत. या ठिकाणचे सर्व दुकाने, मार्केट बंद करण्यात आले आहे. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. हे अतिरेकी कोणत्या दहशतवादी संघटनेचे होते याची माहिती अद्याप मिळाली नसून सुरक्षा दलाचे जवान त्याचाही शोध घेत आहेत.

चार दहशतवादी ठार

दरम्यान, तीन दिवासंपूर्वी सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये शोपियांमध्ये प्रचंड चकमक उडाली. यावेळी चार अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली असून मारण्यात आलेले अतिरेकी लश्कर ए तोयबाचे असल्याचं सांगण्यात येत आहे. या अतिरेक्यांकडे एक एके47 आणि दोन पिस्तुल सापडल्या होत्या. यापूर्वी शोपियां जिल्ह्याच्या रावळपोरा येथे तीन दिवसांपासून चकमक उडाली होती. त्यात एक अतिरेकी मारला गेला. या चकमकीत दहशतवादी विलायत हुसैन ऊर्फ सज्जाद अफगानी याला तीन दिवसानंतर मारण्यात सुरक्षा दलाला यश आलं होतं. अफगाणी हा रावळपोरा येथील राहणारा होता. तो 2018मध्ये तो दहशतवादी बनला होता. लश्कर ए तोयबाने या संपूर्ण परिसराची त्यांच्याकडे जबाबदारी दिली होती. मात्र त्याने नंतर लश्कर हे तोयबाला सोडलं होतं. त्यानंतर तो जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेत सामील झाला होता. (Three CRPF personnel injured in militant attack on outskirts of Srinagar)

संबंधित बातम्या:

अशी ही बनवाबनवी! मोदी सरकारच्या जाहिरातील घर मिळालेली महिला प्रत्यक्षात राहते झोपडीत

 भाजपचं ‘संकल्प पत्र’ जाहीर, ‘सोनार बांग्ला’ बनवण्याचं वचन

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही – जयंत पाटील

(Three CRPF personnel injured in militant attack on outskirts of Srinagar)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.