Marathi News National Tradition of suicide A few years after the suicide of the father, the entire family, which was in debt, committed suicide, son in law, two young and old wife also lost their lives.
आत्महत्येची परंपरा? वडिलांच्या आत्महत्येनंतर काही वर्षांनी कर्जात बुडालेल्या संपूर्ण परिवाराची आत्महत्या, मुलगा-सून, दोन लहानगे आणि वृद्ध पत्नीनेही संपवले जीवन
मनोज झा यांच्या वडलांनीही यापूर्वी फाशी घेऊनच आत्महत्या केली होती. त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी कर्ज घेतले होते, कर्ज चुकवता आले नसल्याने त्यांनी आत्महत्या केली होती. आताही त्यांचा मुलाने आपल्या बहिणीचे लग्न मंदिरात केले होते.
Samstipur family suicideImage Credit source: social media
समस्तीपूर,बिहार– एकाच घरात पाच जणांचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. सगळ्यांचे मृतदेह घारतील छताला लटकलेल्या अवस्थेत होते. या पाचही हत्या आहेत की आत्महत्या, याचा शोध अद्याप लागलेला नाही. मात्र या घटनेमुळे बिहारच्या समस्तीपूर परिसरावर मात्र शोककळा पसरली आहे. मऊ धनेशपूर दक्षिणी या गावात हा प्रकार आज सकाळी उघडकीस आलाय. मृताच्या वडिलांनीही काही वर्षांपूर्वी फाशी घेऊनच आत्महत्या केली होती, त्यामुळे आता झालेल्या या आत्महत्यांचा त्याच्याशी काही संबंध आहे का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येतो आहे. ही घटना समजल्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांनी या घराबाहेर गर्दी केली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हे संपूर्ण कुटुंब कर्जाच्या बोज्याखाली होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास पोलिसांकडून करण्यात येतो आहे.
मनोज झा यांच्या वडलांनीही यापूर्वी फाशी घेऊनच आत्महत्या केली होती. त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी कर्ज घेतले होते, कर्ज चुकवता आले नसल्याने त्यांनी आत्महत्या केली होती. आताही त्यांचा मुलाने आपल्या बहिणीचे लग्न मंदिरात केले होते.
मृतांमध्ये पती–पत्नी दोन मुले आणि आजीचा समावेश
मरणाऱ्यांमध्ये ४२ वर्षीय मनोज झा, त्यांची पत्नी ३८ वर्षीय सुंदरमणी देवी, ६५ वर्षीय आई सीता देवी यांच्यासह १० वर्षांचा लहानगा सत्यम आणि ७ वर्षांचा मुलगा शिवम यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी गांभिर्याने करावा आणि आरोपींना अटक करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
आर्थिक अडचणीत होता परिवार
एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने गावात चर्चांना उधाण आले आहे. हे कुटुंब कर्जात बुडाले होते, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. आर्थिक अडचणीमुळेहे कुटुंब त्रासलेले होते. अनेक ठिकाणांहून कर्ज घेतल्याने हे कुटुंब अडचणीत आलेले होते. कर्ज फेडण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी जीवन संपवले असे सांगण्यात येते आहे.
हत्या की आत्महत्या याचा संभ्रम
घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. सर्वात आधी घराच्या छतावर असलेले मृतदेह खाली आणण्यात आले आहेत. त्यानंतर मृतदेहांना पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले. हत्या की आत्महत्या या दोन्ही एँगलनी पोलीस तपास करीत आहेत. पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतरच या पाचही जणांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.