रेल्वे 100 किमीच्या वेगाने धावत होती, आपत्कालीन खिडकीतून आठ वर्षीय मुलगी पडली, पुढे चमत्कारच घडला…

railway emergency window: घटनेची माहिती मिळाल्यावर ललितपूर जीआरपीला माहिती दिली. ललितपूर पोलिस स्टेशनच्या जीआरपी प्रभारींनी 16-17 किलोमीटर रेल्वे ट्रॅकवर गौरीचा शोध घेण्यासाठी तातडीने 4 टीम तयार केल्या. येथून जीआरपी आणि कुटुंबीयही शोध घेत होते. जंगलात ट्रेन जिथे थांबली होती तेथून काही अंतरावर रुळाच्या बाजूला झुडपात मुलगी रडताना दिसली.

रेल्वे 100 किमीच्या वेगाने धावत होती, आपत्कालीन खिडकीतून आठ वर्षीय मुलगी पडली, पुढे चमत्कारच घडला...
railway emergency window (file Photo)
Follow us
| Updated on: Oct 15, 2024 | 6:04 PM

railway emergency window: उत्तर प्रदेशात धक्कादायक घटना घडली आहे. परंतु त्याचवेळी चमत्कारही घडला आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय आला आहे. शंभर किलोमीटर वेगाने धावणाऱ्या रेल्वेत आपत्कालीन खिडकीजवळ आठ वर्षांची मुलगी बसली होती. ती मुलगी धावत्या रेल्वेतून खिडकीतून बाहेर पडली. काही वेळाने तिच्या आई-वडिलांचा लक्षात हा प्रकार आला. मग रात्रीच्या वेळी ट्रेन थांबवण्यात आली. गाडी दहा ते पंधरा किलोमीटर पुढे आली होती. अखेर ती मुलगी मिळाली. तिच्याबाबत चमत्कार झाला होता. ती मुलगी झाडांमध्ये अडकून पडली होती. तिला काही जखमा झाल्या होत्या. परंतु ती वाचली होती.

कुटुंब गेले होते मध्य प्रदेशात

वृंदावन येथील रंगनाथ मंदिराजवळ राहणारे अरविंद तिवारी, त्यांची पत्नी अंजली यांच्याबाबत ही घटना घडली. त्यांची ८ वर्षांची मुलगी गौरी ही वाचल्यामुळे त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे आभार मानले. हे कुटुंब मध्य प्रदेशातील टिकमगड येथे नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी गेले होते. अष्टमीची पूजा करून ते शुक्रवारी गीता जयंती एक्सप्रेस ट्रेनने मथुरेला येत होते. ललितपूर रेल्वे स्थानकापासून 7-8 किमी अंतरावर हा अपघात झाला. या घटनेत मुलीचा एक पाय फॅक्चर झाला होता.

ट्रेनमधून पडलेली गौरी म्हणते…

ट्रेनच्या आपत्कालीन खिडकीतून पडलेली गौरी म्हणाली, मी ट्रेनच्या खिडकीजवळ बसले होते. भावासोबत खेळत होतो. ट्रेनची खिडकी उघडी होती. अचानक वळण आले आणि जोरदार वाऱ्यामुळे मी खिडकीतून पडली. माझ्या पायाला दुखापत झाली होती, त्यामुळे मला उभे राहता येत नव्हते. सुमारे 2 तास ती झाडीत पडून रडत होती. मला अंधाराची भीती वाटत होती. मग आई-बाबा आले.

हे सुद्धा वाचा

गौरीची आई अंजली म्हणाली, माझी मुलगी सुखरूप परत आल्याने आम्ही सर्व आनंदात आहोत. नवरात्रीमध्ये देवीने एक चमत्कार केला आहे. हा चमत्कार मी कधीही विसरणार नाही. माझ्या मुलीचा दुसरा जन्म झाला आहे.

जीआरपी पोलिसांनी सांगितले…

ट्रेनमध्ये असलेल्या जीआरपी पोलिसांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळाल्यावर ललितपूर जीआरपीला माहिती दिली. ललितपूर पोलिस स्टेशनच्या जीआरपी प्रभारींनी 16-17 किलोमीटर रेल्वे ट्रॅकवर गौरीचा शोध घेण्यासाठी तातडीने 4 टीम तयार केल्या. येथून जीआरपी आणि कुटुंबीयही शोध घेत होते. जंगलात ट्रेन जिथे थांबली होती तेथून काही अंतरावर रुळाच्या बाजूला झुडपात मुलगी रडताना दिसली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.