TV9 च्या Dare2Dream अवॉर्ड्समध्ये MSME मंत्रालयाचे सचिव बी.बी. स्वॅईन मार्गदर्शन करणार
टीव्ही 9 नेटवर्क आणि सॅप इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगातील उद्योजकांना डेअर टू ड्रीम (Dare2Dream) पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा 30 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता संपन्न होणार आहे.
नवी दिल्ली: टीव्ही 9 नेटवर्क आणि सॅप इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगातील उद्योजकांना डेअर टू ड्रीम (Dare2Dream) पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा 30 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता संपन्न होणार आहे. भारताच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे सचिव बी. बी. स्वॅईन या सोहळ्यात प्रमुख पाहुणे असतील. या सोहळ्यामध्ये ते बीजभाषण करणार असून उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. टीव्ही 9 नेटवर्कच्या टीव्ही 9 भारतवर्ष या वृत्तवाहिनीवरुन याचं प्रसारण करण्यात येणार आहे.
Watch Shri B.B. Swain, Secretary(MSME) deliver keynote address at India’s biggest Entrepreneurial Awards @TV9Bharatvarsh on 30.11.2021 at 01.00 PM pic.twitter.com/cGNCCGDfHn
— Ministry of MSME (@minmsme) November 27, 2021
लघू उद्योजकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार
एमसएमई क्षेत्र सेवा आणि उत्पादन या दोन्ही क्षेत्रांमध्ये भरीव रोजगार निर्मिती करून भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचे नेतृत्व करत आहे. भारतातील स्वदेशी उद्योगांच्या योगदानाबद्दल त्यांना प्रोत्साहन देण्याची आत्मनिर्भर भारत अभियानाला पुढं घेऊन जाण्यासाठी टीव्ही 9 नेटवर्क आणि सॅप इंडिया यांच्याकडून डेअर टू ड्रीम पुरस्कार देण्यात येत आहेत.
पुरस्कारांचे विभाग (दोन विभागांमध्ये 15 कॅटेगरीमध्ये पुरस्कार दिले जातील)
- 75 कोटी ते 150 कोटी रुपयांच्या दरम्यान वार्षिक उलाढाल असलेले उद्योग
- 150 कोटींहून अधिक वार्षिक उलाढाल असलेला मिड-कॉर्पोरेट विभाग
कॅटेगरी
- कंपनी ऑफ द इयर – क्षेत्रीय पुरस्कार (प्रत्येक विभागातील 8 ते 9 पुरस्कार)
- वर्षभरातील उदयोन्मुख कंपनी
- तंत्रज्ञानाद्वारे व्यवसाय परिवर्तन
प्रेरणादायी नेता
- तरुण व्यावसायिक नेता
- वर्षातील महिला उद्योजक
- वर्षातील व्यावसायिक व्यक्ती
30 नोव्हेंबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा
टीव्ही 9 नेटवर्क आणि सॅप इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगातील उद्योजकांना डेअर टू ड्रीम (Dare2Dream) पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. TV9 नेटवर्कच्या विविध डिजीटल प्लॅटफॉर्मवरुन हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम वेबकास्ट करण्यात येईल. भारतातील आघाडीची वृत्तवाहिनी TV9 Bharatvarsh वर पुरस्कार सोहळ्याचं प्रसारण केलं जाणार आहे.
इतर बातम्या: