Article 370: काश्मिरात कलम 370 वरुन दोन मुख्यमंत्री आमनेसामने, मेहबुबा मुफ्तींचे आझादांना काय उत्तर?

काश्मिरात राजकारण रंगलं, दोन मुख्यमंत्र्यांचे वार-पलटवार

Article 370: काश्मिरात कलम 370 वरुन दोन मुख्यमंत्री आमनेसामने, मेहबुबा मुफ्तींचे आझादांना काय उत्तर?
दोन सीएम आमनेसामने Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 8:46 PM

श्रीनगर – कलम 370 वरुन जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir)दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये (2 Chief Ministers)वाकयुद्ध सुरु झाले आहे. काँग्रेस सोडून नवी पार्टी स्थापन करणाऱ्या गुलाम नबी आजाद यांनी रविवारी वक्तव्य केले होते की- कलम 370 पुन्हा लागू होईल या स्वप्नांत काश्मिरींनी राहू नये. यावर माजी मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti)यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या सोमवारी म्हणाल्या की- आमचा विचार हा सकारात्मक आहे. पुन्हा एकदा कलम 370 काश्मीरला बहाल करण्यात येईल.

कलम 370 वर गुलाम नबी आझाद यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक वक्तव्य असल्याचेही मुफ्ती म्हणाल्या आहेत. त्या पुढे म्हणाल्या की- कलम 370 हटवल्याने काश्मीरची समस्या सुटलेली नाही. तर ही समस्या अधिक जटील झालेली आहे. ज्यावेळी इंग्रजांविरोधात लढू शकत नाही, अशी परिस्थिती होती, त्यावेळी जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, सर सय्यद खान, भगत सिंग यांनी ती लढाई लढली आणि ते जिंकले. अशाच प्रकाराने आम्ही भाजपाशी लढू आणि त्यांनी केलेले आत्याचार संपवू. आमचा विचार हा सकारात्मक आहे.

मुफ्तींचा भाजपावर हल्ला

लालकृष्ण अडवाणी जेलमध्ये असलेल्या यासीन मलिक यांच्याशी हातमिळवणी करतील, असे कधी वाटले होते का, पंतप्रधान मोदी नवाज शरीफ यांच्या घरातील एका लग्नसोहळ्यात पाकिस्तानात जाईल, असे कधी वाटले होते का. त्याचप्रमाणे कलम ३७० पुन्हा लागू करण्यात येईल, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

370 कलमावरुन दिशाभूल करणार नाही-आझाद

रविवारी बारामुल्लात एका रॅलीला संबोधित करताना गुलाम नबी आझाद म्हणाले होते की- आता काश्मिरात पुन्हा कलम 370 लागू होणार नाही. काश्मिरींनी हे स्वप्न पाहणे आता सोडून द्यावे. या नेत्यांच्या बोलण्यात अडकू नका. ते राजकारणासाठी काश्मिरी नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. जोपर्यंत संसदेत पुन्हा दोन तृतियांश मते पडणार नाहीत, तोपर्यंत काश्मिरात 370 कलम पुन्हा लागू होणार नाही. या मुद्द्यावर तुमची दिशाभूल करणार नाही आणि तुम्हाला होऊही देणार नाही.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.