AP Youth Death : युट्युब पाहून दोन विद्यार्थ्यांनी केला लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेचा प्रयत्न; तरुणाचा दुदैवी मृत्यू

ही शस्त्रक्रिया हॉस्पिटलमध्ये न करता एका हॉटेलमध्ये करण्यात आली. प्रजनन अवयव काढून टाकण्याची शस्त्रक्रिया गुरुवारी नेल्लोर येथील एका खासगी हॉटेलमध्ये कोणतीही वैद्यकीय खबरदारी न घेता केली गेली. कुठल्याही सक्षम वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ही शस्त्रक्रिया केली गेली नसल्यामुळे एका तरुणाचा हकनाक बळी गेला.

AP Youth Death : युट्युब पाहून दोन विद्यार्थ्यांनी केला लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेचा प्रयत्न; तरुणाचा दुदैवी मृत्यू
अल्पवयीन मुलीला प्रियकरानेच लुटलं Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 3:52 PM

विजयवाडा : युट्युबवरील नको त्या गोष्टींचा अतिरेक झाल्याने त्याचा धोका जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना प्रकाशझोतात आली आहे. फार्मसीच्या दोन विद्यार्थ्यांनी यूट्यूब व्हिडिओ (Youtube Video)च्या मदतीने लिंग बदला (Gender Change)ची शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान 28 वर्षीय तरुणाचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील नेल्लोरमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेने युट्युबवरील वादग्रस्त, आक्षेपार्ह आणि जीवघेण्या व्हिडिओंचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. (Two students underwent gender reassignment surgery after watching YouTube, Death of a young man)

हॉस्पिटल नव्हे, खाजगी हॉटेलमध्ये केला शस्त्रक्रियेचा प्रयत्न

ही धक्कादायक घटना घडण्यास काही गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. यात सुरक्षेच्या अभावाचा गंभीर मुद्दाही कारण ठरला आहे. ही शस्त्रक्रिया हॉस्पिटलमध्ये न करता एका हॉटेलमध्ये करण्यात आली. प्रजनन अवयव काढून टाकण्याची शस्त्रक्रिया गुरुवारी नेल्लोर येथील एका खासगी हॉटेलमध्ये कोणतीही वैद्यकीय खबरदारी न घेता केली गेली. कुठल्याही सक्षम वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ही शस्त्रक्रिया केली गेली नसल्यामुळे एका तरुणाचा हकनाक बळी गेला. याप्रकरणी बीफार्माच्या दोघा विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.

सोशल मीडियातून झाली लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेची बोलणी

पीडित तरुणाला त्याचे लिंग बदलायचे होते. यादरम्यान तो सोशल मीडियावर बी फार्माच्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आला. त्या विद्यार्थ्यांनी त्या तरुणाची दिशाभूल केली आणि त्याच्यावर अत्यंत कमी खर्चात लिंग बदलाची शस्त्रक्रिया करू असे आश्वासन दिले. पुरेसे ज्ञान नसतानाही बी फार्माच्या विद्यार्थ्यांनी ही शस्त्रक्रिया केली. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, कामेपल्ली गावातील पीडित तरुणाचा मृत्यू जास्त रक्तस्त्राव तसेच रक्तस्राव थांबवण्यासाठी दिलेल्या औषधांच्या ओव्हरडोजमुळे झाला. त्याच्यावर हॉटेलच्या ज्या खोलीत शस्त्रक्रिया करण्यात आली, ती खोली अस्वच्छ असल्याचे पोलिसांनी सांगितले. तरुणाचा मृत्यू होताच विद्यार्थ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. यादरम्यान खोलीत मृतदेह आढळल्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांना तरुणाच्या मृत्यूची माहिती मिळाली. (Two students underwent gender reassignment surgery after watching YouTube, Death of a young man)

इतर बातम्या

CCTV | बाईकला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात, पाच सेकंदात गाडी सात वेळा पलटी

CCTV | भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, डोंबिवलीत भरदिवसा प्रकार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.