Udayanraje Bhonsle : उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला, नवी दिल्लीत नेमकं काय घडलं? राजकीय चर्चांना उधाण
भाजपचे (BJP) राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhonsle) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतलीय.
नवी दिल्ली:भाजपचे (BJP) राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhonsle) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतलीय. उदयराजे भोसले यांनी नवी दिल्लीतील 6 जनपथ या ठिकाणी शरद पवारांची भेट घेतलीय. शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांच्यातील ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, सातारा जिल्हा बँक निवडणूक आणि आगामी सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे.
उदयनराजे भोसले यांचं ट्विट
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचं ट्विट खासदार उदयनराजे भेसले यांनी केलं आहे. उदयनराजे भोसले यांच्या या भेटीची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
आदरणीय खासदार शरद पवार यांची दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट.@PawarSpeaks pic.twitter.com/eGpFl3MRIK
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) December 15, 2021
जिल्हा बँकेत उदयनराजे भोसले बिनविरोध
सातारा जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. यानिवडणुकीत सुरुवातीला खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात उमेदवार देण्यासंदर्भात चाचपणी केली होती. मात्र, त्यानंतर उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनेलमध्ये सहभागी करुन घेत त्यांच्या बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा केला होता. जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्तानं उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधील संबंध सुधारण्यास मदत झाल्याचं दिसून आलं होतं. जिल्हा बँक अध्यक्ष निवडीच्या दिवशी देखील उदयनराजे भोसले पूर्ण वेळ हजर राहिले होते.
उदयनराजे भोसले शरद पवार भेटीनिमित्त जुन्या आठवणींना उजाळा
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार म्हणून उदयनराजे भोसले यांनी दोन टर्म पूर्ण केल्या आहेत. 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्तानं उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीच्या पक्षनेतृत्त्वामधील संवाद पुन्हा सुरु झाल्याचं दिसून आलं आहे. शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांच्यातील भेटीचा फोटो पाहून कार्यकर्त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
इतर बातम्या:
OBC Reservation | सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणासंदर्भातली याचिका फेटाळली, राज्य सरकारला मोठा धक्का
Udayanraje Bhonsle meet Sharad Pawar at Delhi Residence political discussion started in Satara