Video: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानांच्या ‘मद्य प्रदेश’ धोरणाविरोधात उमा भारतीचं खळ्ळ खट्याक, उलच दगड की हाण दारु दुकानावर
मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी रविवारी दारूच्या दुकानाची तोडफोड केली. भोपाळच्या भेल परिसरातील आझाद नगर येथील दारूच्या दुकानात घुसून उमा भारती यांनी दगडफेक केली. त्याचवेळी ते बघून बघ्यांची गर्दी झाली.
भोपाळ: मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती (Uma Bharati) यांनी रविवारी दारूच्या दुकानाची तोडफोड केली. भोपाळच्या (Bhopal)बीएचईएव परिसरातील आझाद नगर येथील दारूच्या (Liquor) दुकानात घुसून उमा भारती यांनी दगडफेक केली. ही घटना पाहून तिथं बघ्यांची गर्दी झाली. उमा भारती यांनी दारूच्या दुकानात दगड फेकतानाचा व्हिडीओ मोबाईलवरुन चित्रित करण्यात आला. हा व्हिडीओ उमा भारती यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंट वरुन शेअर केला आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट करुन उमा भारती यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. मजुरांची वस्ती असून तिथं मंदिर आहे, लहान मुलांची शाळा आहे. ज्या वेळी महिला आणि मुली घरांच्या छतावर उभ्या असतात त्यावेळी दारू पिलेल्या लोकांच्या वर्तनामुळं त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचं उमा भारतींनी म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओ
1) बरखेड़ा पठानी आझाद नगर, बीएचईएल भोपाल , यहाँ मज़दूरों की बस्ती में शराब की दुकानों की शृंखला हैं जो की एक बड़े आहाता में लोगों को शराब परोसते हैं । pic.twitter.com/dNAXrh1jRY
— Uma Bharti (@umasribharti) March 13, 2022
शिवराज सिंह चौहान यांच्याकडे तक्रार
उमा भारती यांनी मजुरांची सगळी कमाई या दारुच्या दुकानांवर उधळली जात असल्याचाही आरोप केला आहे. या परिसरात राहणाऱ्या महिलांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. त्याच्या मागणीला पाठिंबा देत उमा भारती या याठिकाणी जाऊन दारुच्या दुकाना जात दारुच्या बाटल्यांवर दगडफेक केली आहे. भारती यांनी दारू दुकानं बंद होण्यासाठी शिवराज सिंह चौहान यांच्याकडे मागणी केली आहे.
प्रशासनानं सातत्यानं या दुकानांवर कारवाई करत ती बंद करण्यासाठी आश्वस्त केलं होतं. मात्र अखेरपर्यंत कोणतीही कारवाई केली नव्हती. अखेर उमा भारती या दुकानांवर धडक देत दगडफेक करत प्रशासनाला इशारा दिलाय. प्रशासनानं दरवेळी दुकानं बंद करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, कित्येक वर्ष झाली दुकान बंद झाली नाहीत त्यामुळं आता मी प्रशासनाला येत्या आठ दिवसात दुकान बंद करण्याचा इशारा देत असल्याचं उमा भारती म्हणाल्या.
शिवराजसिंह यांच्या सरकारनं दारुवरील शुल्क घटवलं
या वर्षी जानेवारी महिन्यात मध्य प्रदेश सरकारने दारू स्वस्त केली होती. त्यावेळी उमा भारती यांनी गेल्या वर्षी म्हटले होते की 15 जानेवारी 2022 पर्यंत दारू बंदी करावी अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला होता. मात्र, तारीख संपून अवघ्या दोन दिवसांनी दारूबंदी तर दूरच, शिवराज यांच्या मंत्रिमंडळाने नवीन दारू धोरण जाहीर करत मद्यावरील शुल्क घटवलं. नवीन मद्य धोरणांतर्गत विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्क कमी करण्यात आलं.
इतर बातम्या:
दारूच्या नशेत पठ्ठ्याने असं काही केलं की नागरिकांसह पोलीसही चक्रावले! वसईत नेमकं काय घडलं?
गौतम अदानी खरेदी करणार अनिल अंबानींची कंपनी; रिलायन्स कॅपिटलसाठी या तारखेपर्यंत आहे बोली