UP Election : उत्तर प्रदेशात काका-पुतण्या पुन्हा एकत्र, अखिलेश आणि शिवपाल यादव 5 वर्षानंतर एकत्र निवडणूक लढवणार

अखिलेश यादव यांनी जाहीर केलं की समाजवादी पक्ष आणि शिवपाल यादव यांची 'प्रगतिशील समाजवादी पार्टी लोहिया' पक्ष मिळून निवडणूक लढतील. दरम्यान, समाजवादी पक्ष शिवपाल यादवांच्या पक्षाला किती जागा देणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, शिवपाल यादव समर्थकांना 15 जागा दिल्या जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

UP Election : उत्तर प्रदेशात काका-पुतण्या पुन्हा एकत्र, अखिलेश आणि शिवपाल यादव 5 वर्षानंतर एकत्र निवडणूक लढवणार
शिवपाल यादव, अखिलेश यादव
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 2:52 PM

मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (Uattar Pradesh Election) पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी गुरुवारी लखनऊमध्ये त्यांचे काका शिवपाल यादव (Shivpal Yadav) यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर अखिलेश यादव यांनी जाहीर केलं की समाजवादी पक्ष आणि शिवपाल यादव यांची ‘प्रगतिशील समाजवादी पार्टी लोहिया’ पक्ष मिळून निवडणूक लढतील. दरम्यान, समाजवादी पक्ष शिवपाल यादवांच्या पक्षाला किती जागा देणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, शिवपाल यादव समर्थकांना 15 जागा दिल्या जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सत्ता काबिज करण्यासाठी अखिलेश यादवांचे जोरदार प्रयत्न

उत्तर प्रदेशची सत्ता पुन्हा काबिज करण्यासाठी अखिलेश यादव प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. त्यामुळेच अखिलेश यादव यांनी आपले काका शिवपाल यादव यांच्याशी खातं जुळवून घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अखिलेश यांनी अनेक सार्वजनिक व्यासपीठावरुन सांगितलं की काकांचा योग्य सन्मान केला जाईल. राजकीय लढाईत ते आमच्यासोबत आहेत. इतकंच नाही तर शिवपाल यादव यांचे जवळच्या नेत्यांना अॅडजस्ट करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

काका-पुतण्यात 2016 मध्ये विवादाला सुरुवात

मुलायम सिंह यादव यांच्या परिवारातील महत्वपूर्ण सदस्यांमधील वाद देशापासून लपलेला नाही. अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यादव यांच्यातील विवाद 2016 मध्ये समोर आला होता. बराच काळ हा तणाव चालू होता. या घरगुती लढाईत अखिलेश यादव यांचा विजय झाला होता. त्यानंतर मात्र अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांनी परिवारात कुठलीही लढाई नसल्याचं सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे काका-पुतणे पुन्हा एकत्र येत आहेत.

इतर बातम्या :

‘विद्यापीठाचे कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरणार’, कुण्या ‘सचिन वाझे’सारख्याला कुलगुरू करणार का? शेलारांचा सवाल 

मोदी, राजीव गांधी आणि राज ठाकरे… तीन फोटो; ज्यांची दोन दिवसांपासून देशभर चर्चा

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....