AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुपरपॉवर अमेरिका भारताच्या विनाशकारी तोफेचा प्रेमात, भारताकडून खरेदी करणार ही स्वदेशी तोफ

US Inks Deal With Bharat Forge: भारत फोर्जची सहायक कंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टम्स लिमिटेड (KSSL) सोबत करारावर अमेरिकन कंपनीने हस्ताक्षर केले. या करारानुसार भारतात निर्मिती या प्रगत तोफेची खरेदी अमेरिका करणार आहे.

सुपरपॉवर अमेरिका भारताच्या विनाशकारी तोफेचा प्रेमात, भारताकडून खरेदी करणार ही स्वदेशी तोफ
| Updated on: Feb 21, 2025 | 6:31 PM
Share

US Inks Deal With Bharat Forge: भारत अमेरिकेकडून आतापर्यंत शस्त्र खरेदी करत आला आहे. परंतु अमेरिका भारताकडून शस्त्र खरेदी करणार? असे म्हटल्यावर प्रत्येकाला आश्चर्य वाटेल. भारताची अत्याधुनिक स्वदेशी तोफेच्या प्रेमात जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्र अमेरिका पडला आहे. भारताची आधुनिक तोफ खरेदी करण्यासाठी अमेरिकन कंपनी एएम जनरल मोटर्सने भारत फोर्ज लिमिटेडसोबत करार केला आहे. भारत फोर्जची सहायक कंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टम्स लिमिटेड (KSSL) सोबत करारावर अमेरिकन कंपनीने हस्ताक्षर केले. या करारानुसार भारतात निर्मिती या प्रगत तोफेची खरेदी अमेरिका करणार आहे. प्रथमच अमेरिका भारताकडून तोफेची खरेदी करणार आहे.

ब्रह्मोस क्षेपणास्त्रानंतर दुसरा करार

आबुधाबीमध्ये आयोजित IDEX 2025 संरक्षण प्रदर्शनात हा करार झाला. एएम जनरल जगातील प्रमुख सैन्य वाहन निर्मिती कंपनी आहे. कधीकाळी शस्त्रांची आयात करणारा भारत आता शस्त्रांची निर्यात करु लागला आहे. भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र यापूर्वी फिलिपिन्सला विकले आहे. आता अमेरिकन कंपनीसोबत झालेला करार म्हणजे संरक्षण क्षेत्रात भारताचा दबदबा वाढत असल्याचे सिद्ध होत आहे.

कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टम्स लिमिटेड (KSSL) भारतात निर्मिती होणारे 105 एमएस आणि 155 एमएस कॅलिबरचे माउंटेड, टोव्ह आणि अल्ट्रा-लाइट गन सिस्टमची विक्री एएम जनरलला करणार आहे. केएसएसएल स्वदेशी शस्त्र प्रणाली, ऑफ-रोड प्रोटेक्टेड मोबिलिटी सॉल्यूशन्स आणि उच्च-तंत्रज्ञ उत्पादन डिजाइन आणि विकासात काम करते.

भारतीय तोफ घातक

फोर्जच्या तोफा पूर्णपणे इलेक्ट्रिक ड्रायव्ह सिस्टमवर चालतात. ही प्रणाली तोफांना विश्वनीय बनवते. तसेच खूप जास्त घातक बनवले. तोफाचे डिझाइन यापद्धतीने केले आहे की त्याच्या देखभाल खर्च खूप होणार आहे. त्यामुळे सर्वात चांगली तोफ ही झाली. हा करार भारत अन् अमेरिका यांच्यात संरक्षण क्षेत्रात वाढत असलेल्या सहकार्याचे संदेश देणारे आहे.

करारानंतर भारत फोर्जचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी म्हणाले, आमच्या तांत्रिक क्षमतेचा पुरावा आहे. तोफखाना सोल्यूशनमध्ये जागतिक नेता बनण्याच्या आमच्या ध्येयाकडे एक मोठे पाऊल आहे. हा करार एएम जनरल सारख्या आघाडीच्या जागतिक संरक्षण कंपन्यांमधील आमच्या क्षमतांवरील विश्वास दर्शवतो.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.