नोकरीचं आमिष देत शरीर सुखाची मागणी, अश्लील व्हिडीओ बनवला, पीडिता अचानक गायब, भाजप आमदारावर आरोप
कर्नाटकाचे भाजप आमदार रमेश जारकिहोली यांची एक कथित व्हिडीओ क्लीप समोर आलीय (Karnataka sex cd scandal case).
बंगळुरु : महाराष्ट्रात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण प्रचंड गाजलं. या प्रकरणामुळे शिवसेना नेते संजय राठोड यांना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. आता तशाच प्रकारचा गदारोळ महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात म्हणजेच कर्नाटकात बघायला मिळतोय. हे प्रकरण देखील महिला अत्याचारा संबंधितच आहे. पण अगदी पूजा चव्हाण प्रकरणासारखं नाही (Karnataka sex cd scandal case).
नेमकं प्रकरण काय?
कर्नाटकाचे भाजप आमदार रमेश जारकिहोली यांची एक कथित व्हिडीओ क्लीप समोर आलीय. या व्हिडीओ क्लीपमुळे कर्नाटकात प्रचंड गदारोळ झाला आणि त्यामुळे जारकिहोली यांना आपल्या मंत्रिपदाचाही राजीनामा द्यावा लागलाय. तरीही हे प्रकरण अजूनही धगधगतं आहे. पण जारकिहोली यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. संबंधित व्हिडीओ हा बनावट आणि खोटा असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. मात्र, या व्हिडीओत दिसणाऱ्या पीडित मुलीच्या वडिलांनी आमदार जारकिहोली यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जारकिहोली यांनी मुलीचं अपहरण करुण तिचं लैंगिक शोषण केलं. याशिवाय अश्लील व्हिडीओ बनवले, असे अनेक गंभीर आरोप पीडितेच्या वडिलांनी केले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस पीडित मुलीचा शोध घेत आहेत.
पीडितेच्या वडिलांचे नेमके आरोप काय?
पीडित मुलगी ही 25 वर्षांची आहे. तिने इंजिनीअरिंगचं शिक्षण नुकचतंच पूर्ण केलंय. ती बंगळुरु येथील एका वसतीगृहात राहत होती. ती नोकरीच्या शोधात होती. आमदार जारकिहोली यांनी पीडितेला नोकरीचं आमिष देत शारीरीक सुखाची मागणी केली, असा गंभीर आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे (Karnataka sex cd scandal case).
पीडित मुलीच्या वडिलांनी जारकिहोली यांच्या विरोधात बेळगावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. जारकिहोली यांनी पीडितेचं अपहरण केलं. त्यानंतर तिला बंदिस्त केलं. तिचे अश्लील व्हिडीओ शूट करण्यात आले. त्यानंतर आरोपींनी ते व्हिडीओ प्रसारमाध्यमांसोबत शेअर करुन आमची प्रतिष्ठा धुळीला मिळवली, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केलाय. सध्या पोलीस मुलीचा शोध घेत आहेत. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून मुलीचा शोध सुरु आहे. मात्र, अजूनही मुलीचा शोध लागलेला नाही.
कोण आहे रमेश जारकिहोली?
रमेश जारकिहोली कर्नाटकमधील बडे नेते आहेत. ते सहावेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते राज्यातील सर्वात शक्तीशाली राजकीय कुटुंबातील आहेत. ते बेळगावी जिल्ह्यातील मोठे व्यवसायिक आहेत. ते 2019 च्या निवडणुकीआधी भाजपात सामील झाले होते. त्याआधी ते काँग्रेसमध्ये होते. विशेष म्हणजे काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिल्याची चर्चा होती.
हेही वाचा : जळगावात भाजपचे 27 नगरसेवक कसे फुटले, 15 संख्याबळ असताना शिवसेनेचा महापौर कसा? आतल्या घडामोडी काय?