Violence in Delhi : दिल्ली हिंसेचा तपास करण्यासाठी दहा पथकं तैनात, दंगल आणि हत्येचे गुन्हे दाखल
दिल्लीत हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) शोभा यात्रेवळी झालेल्या हिंसेचा तपास दिल्ली पोलिसांचा ( Delhi Police ) क्राईम ब्रँच स्पेशल सेल टीम करत आहे. या तपासासाठी दिल्ली पोलिसांनी दहा पथकं स्थापन केली आहेत.
नवी दिल्ली: दिल्लीत हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) शोभा यात्रेवळी झालेल्या हिंसेचा तपास दिल्ली पोलिसांचा (Delhi Police) क्राईम ब्रँच स्पेशल सेल टीम करत आहे. या तपासासाठी दिल्ली पोलिसांनी दहा पथकं स्थापन केली आहेत. या हल्ल्यात आतापर्तयंत सहा पोलीस जखमी झाले आहेत. यातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या हाताला गोळी लागली आहे. तसेच या प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे. हत्या आणि दंगलीचे गुन्हे दाखल करून पोलिसांनी आरोपींची चौकशी सुरू केली आहे. ज्या दिल्लीच्या जहांगीरपुरी (Riots in Jahangirpuri) भागात हा राडा झाला, त्या ठिकाणी आरएएफची दोन पथकं तैनात करण्यात आली आहेत. या परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. दिल्लीतील हिंसेनंतर यूपी पोलिसांना अॅलर्ट करण्यात आलं आहे. हनुमान जयंतीच्या शोभा यात्रेवर जहांगीरपुरीत दगडफेक झाली होती. त्यात पोलीसही जखमी झाले होते. त्यामुळे दिल्लीलाच लागून असलेल्या यूपी पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दिल्लीतील हिंसेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि विशेष पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) यांच्याशी चर्चा केली. तसेच कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्याचे आदेश शहा यांनी दिले. अज्ञात लोकांनी दगडफेक केली आणि काही वाहनांना आग लावली, असं पोलिसांनी सांगितलं. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. जहांगीरपुरीसह अन्य संवेदनशील परिसरात अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दंगलखोरांविरोधाक कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचं दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितलं.
अफवांवर लक्ष देऊ नका
अस्थाना यांनी ट्विट करून वरिष्ठ पोलिसांना काही सूचना दिल्या आहे. वरिष्ठ पोलिसांनी संबंधित परिसरात राहावं. कायदा आणि सुव्यवस्थेवर बारकाईनं लक्ष ठेवावं. दंगल झालेल्या परिसरात गस्ती वाढवा. नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर लक्ष देऊ नये, असं आवाहनही अस्थाना यांनी केलं आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या मते, ही पारंपारिक शोभा यात्रा होती. या मिरवणुकीवेळी पोलीस तैनात होते. कुशल सिनेमाजवळ मिरवणूक येताच दोन समुदायामध्ये वाद आणि हाणामारी सुरू झाली. यावेळी दगडफेक झाली. ही हिंसा रोखत असताना काही पोलीस जखमी झाले, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. तसेच केंद्र सरकारने कायदा आणि सुव्यवस्था राखावी, असंही म्हटलं आहे.
दिल्ली के जहांगीर पुरी में शोभायात्रा में पथराव की घटना बेहद निंदनीय है। जो भी दोषी हों उन पर सख़्त कार्रवाई होनी चाहिए। सभी लोगों से अपील- एक दूसरे का हाथ पकड़कर शांति बनाए रखें।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 16, 2022
संबंधित बातम्या:
Violence in Delhi : हनुमान जयंतीदिनी दिल्लीत हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक आणि तुफान राडा; केजरीवालांचं शांततेचं आवाहन
काँग्रेसचे मिशन 2024… सोनियांचे बड्या नेत्यांसोबत विचारमंथन, प्रशांत किशोर यांचे सादरीकरण