Delhi Farmers Tractor Rally: हिंसा हा पर्याय नाही; शेतकरी आंदोलनावर राहुल गांधींसह कोण काय म्हणालं?

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने त्यावर राजकीय नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ("Violence Not Solution To Any Problem": Rahul Gandhi On Farmers' Protest)

Delhi Farmers Tractor Rally: हिंसा हा पर्याय नाही; शेतकरी आंदोलनावर राहुल गांधींसह कोण काय म्हणालं?
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 3:08 PM

नवी दिल्ली: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने त्यावर राजकीय नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या हिंसक आंदोलनाचं एकाही राजकीय नेत्यांने समर्थन केलेलं नाही. मात्र, दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने तातडीने मंजूर कराव्यात अशी मागणी हे राजकीय नेते करत आहेत. (“Violence Not Solution To Any Problem”: Rahul Gandhi On Farmers’ Protest)

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणतीही समस्या सोडण्यासाठी हिंसा हा त्याचा पर्याय असूच शकत नाही. कुणालाही मार लागला तरी आपल्या देशाचंच नुकसान होणार आहे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांना गोळ्या घालायच्या का?

टीव्ही 9 भारतवर्षनेही शेतकरी नेते नरेश टिकैत यांना काही प्रश्न केले. शेतकरी आंदोलकांनी पोलिसांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी मार्ग बदलले. बॅरिकेट्सही तोडल्या. आंदोलनात दारूच्या बाटल्या सापडत आहेत, असं टिकैत यांना विचारलं. त्यावर टिकैत भडकले. मग काय शेतकऱ्यांना गोळ्या घालायच्या का? असा सवाल टिकैत यांनी केला.

शेतकरी हल्ल्याचा निषेध

शेतकरी नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीमारचा निषेध केला आहे. शेतकरी दिलेल्या मार्गावरून जात आहेत. संयुक्त शेतकरी मोर्चाचा एकही सदस्य आऊटर रिंग रोडला गेला नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात झालेल्या हिंसेचा निषेध करतो. सर्वांना शांत राहण्याचं आवाहन करत आहोत, असं राजेवाल यांनी सांगितलं.

पोलिसांचं शांतता राखण्याचं आवाहन

दरम्यान, शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. शेतकऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये. शांतता राखावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. (“Violence Not Solution To Any Problem”: Rahul Gandhi On Farmers’ Protest)

अन् शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलं

शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. शेतकऱ्यांना रॅलीसाठी जो मार्ग आखून दिला होता. त्या मार्गावरून शेतकऱ्यांनी रॅली काढली नाही. शेतकऱ्यांनी वेगळ्याच मार्गाने रॅली काढली होती. शेतकऱ्यांचा एक जत्था गाजीपूर बॉर्डरवरून आयटीओला पोहोचला होता. हा जत्था लाल किल्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. अक्षरधाम-नोएडा मार्गावर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना आऊटर रिंगरोडवरून जाण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, या मार्गाने न जाता आंदोलकांनी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. याच दरम्यान शेतकऱ्यांमधून पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. ही दगडफेक सुरू होताच पोलिसांनीही शेतकऱ्यांवर लाठीचार्ज सुरू केला. त्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी पोलिसांच्या बॅरिकेट्स तोडल्या. शेतकऱ्यांनी काही वाहनांची तोडफोडही केली. परिणामी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करावा लागला. (“Violence Not Solution To Any Problem”: Rahul Gandhi On Farmers’ Protest)

संबंधित बातम्या:

पोलिसांची व्हॅन, क्रेनवर आंदोलकांचा ताबा, मेट्रो बंद, शेतकरी आंदोलनाने तणाव; दिल्लीला छावणीचं स्वरुप

दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान पोलीस-शेतकरी भिडले, दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज

प्रजासत्ताक दिनी दिल्ली धुमसली, शेतकऱ्यांची लाल किल्ल्यावर धडक, संयमी रॅली ते अंसतोष, वाचा सविस्तर

(“Violence Not Solution To Any Problem”: Rahul Gandhi On Farmers’ Protest)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.