AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंध्र प्रदेशला मिळणार नवी राजधानी, अमरावती इतिहास जमा होणार

23 एप्रिल 2015 रोजी अमरावतीला आंध्र प्रदेशची राजधानी घोषित करण्यात आली. त्यानंतर 2020 मध्ये राज्याच्या तीन राजधानींचे नियोजन करण्यात आले.

आंध्र प्रदेशला मिळणार नवी राजधानी, अमरावती इतिहास जमा होणार
वायएस जगन मोहन रेड्डीImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
| Updated on: Jan 31, 2023 | 3:31 PM
Share

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (Jagan Reddy) यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी राज्याची राजधानी बदलण्याचा (Andhra Pradesh Capital) निर्णय घेतला आहे. आता अमरावती नाही तर विशाखापट्टणम (Visakhapatnam)ही आंध्रप्रदेशची नवी राजधानी असणार आहे. त्यांनी नव्या राजधानीत ग्लोबल इन्व्हेस्टर समिट आयोजित करण्याची घोषणा केली आहे.

सीएम रेड्डी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, ‘मी तुम्हाला विशाखापट्टणमला आमंत्रित करतो. विशाखापट्टणम येत्या काही दिवसांत आमची राजधानी बनणार आहे. येत्या काही महिन्यांतच मी विशाखापट्टणमलाही शिफ्ट होत आहे. ३ आणि ४ मार्चला विशाखापट्टणम येथे या शिखर परिषदेचे आयोजन करणार आहोत.

नऊ वर्षांपुर्वी तेलंगणा

तेलंगणापासून वेगळे झाल्यानंतर 23 एप्रिल 2015 रोजी अमरावतीला आंध्र प्रदेशची राजधानी घोषित करण्यात आली. त्यानंतर 2020 मध्ये राज्याच्या तीन राजधानींचे नियोजन करण्यात आले. यामध्ये अमरावती, विशाखापट्टणम आणि कुर्नूल या शहरांचा समावेश आहे. मात्र, नंतर ती मागे घेण्यात आली आणि अमरावती ही राजधानी राहिली.

विशाखापट्टणमचे वैशिष्ट्ये

विशाखापट्टणम आंध्र प्रदेश राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. विशाखापट्टणम शहर आंध्र प्रदेशच्या ईशान्य भागात पूर्व घाट व बंगालच्या उपसागराच्या मध्ये वसले आहे. हे भारतामधील १७व्या क्रमांकाचे मोठे शहर होते. वॉल्टेअर आणि विशाखापट्टणम ही जुळी शहरे आहेत. वॉल्टेअर हे एक रेल्वे जंक्शन आहे. देशातील पाचव्या क्रमांकाच्या वर्दळीचे बंदर विशाखापट्टणम आहे. भारतीय नौसेनेच्या ईस्टर्न नेव्हल कमांडचे मुख्यालय येथे आहे.

जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.