ISIS: भाजपा नेत्याची हत्या करुन पैगंबर वादग्रस्त वक्तव्याचा घ्यायचा होता बदला, रशियात पकडलेल्या ISIS च्या दहशतवाद्याचे जाणून घ्या पूर्ण प्लॅनिंग
रशियाच्या केंद्रीय तपास यंत्रणेने सांगितले आहे की, रशियावरुन भारतात य़ेत असताना या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. हा दहशतवादी हा आत्मघातकी बॉम्ब हल्लेखोर असण्याची शक्यता आहे. या दहशतवाद्याला तुर्कीत भरती करण्यात आले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला कट्टरपंथी तयार करण्यात आले होते. ईसिसच्या प्रतिनिधींनी त्याची तुर्कीत भेट घेतली होती.
मॉस्को- रशियाच्या संघीय सुरक्षा यंत्रणांनी भारतात दहशतवादी हल्ला (terrorist attack in India)करण्याच्या प्रयत्नात असलेल्य़ा आंतराराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट म्हणजेच इसिसच्या (Islamic state)एका दहशतवाद्याला अटक केली आहे. या दहशतवाद्याच्या टार्गेटवर भाजपाचा एक वरिष्ठ नेता असल्याची माहिती आहे. मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपुर शर्मा (controversial statement by Nupur sharma) यांच्या वक्तव्याचा बदला घेण्यासाठी, भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याला मारण्याचा या दहशतवाद्याचा प्लॅन होता. रशियाच्या केंद्रीय यंत्रणांनी ही माहिती सोमवारी दिली आहे. इतकेच नाही तर भारतात हा हल्ला करण्यासाठी या दहशतवाद्याला विशेष ट्रेनिंग देण्यात आल्याचीही माहिती आहे.
रशियावरुन भारतात येत असताना केली अटक
रशियाच्या केंद्रीय तपास यंत्रणेने सांगितले आहे की, रशियावरुन भारतात य़ेत असताना या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. हा दहशतवादी हा आत्मघातकी बॉम्ब हल्लेखोर असण्याची शक्यता आहे. या दहशतवाद्याला तुर्कीत भरती करण्यात आले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला कट्टरपंथी तयार करण्यात आले होते. ईसिसच्या प्रतिनिधींनी त्याची तुर्कीत भेट घेतली होती. तिथेच त्याने भारतात येण्यापूर्वी शपथही घेतली होती. या दहशतवाद्याच्या निशाण्यावर भारतातील सत्ताधारी नेत्यांपैकी एक नेते असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
भारतात पोहचल्यानंतर हँडलरकडून मिळणार होती स्फोटके
हा दहशतवादी मध्य आशियातील एका देशाचा रहिवासी आहे. एप्रिल ते जूनच्या काळात हा दहशतवादी तुर्कीत राहिला होता. एफएसबी या सुरक्षा यंत्रणेने त्याचा एक व्हिडीओही जारी केला आहे, त्यात त्याचा चेहरा लपवण्यात आलेला आहे. भारतात हल्ला करण्यासाठी त्याला खास ट्रेंनिंग देण्यात आल्याची कबुलीही या दहशतवाद्याने दिली आहे. भारतात तो पोहचल्यानंतर एका हँडलरच्या माध्यमातून त्याला हल्ला करण्यासाठीची स्फोटके मिळणार होती. मोहम्मद पैगंबर यांच्या कथित अपमान प्रकरणाचा बदला घेण्याचा विडाच या दहशतवाद्याने उचललेला होता.
विशेष ट्रेनिंग घेतल्याचे केले मान्य
या दहशतवाद्याने तुर्कीमध्ये विशेष दहशतवादी हल्ल्याचे ट्रेनिंग घेतल्याचे मान्य केले आहे. भाजपा नेत्याच्या हत्येचे निर्देश त्याला इसिसकडून देण्यात आले होते. इसिसच्या दहशतवाद्याला रशियात अटक केल्यानंतर आता भारतातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. देशातील नेत्यांची सुरक्षा अधिक कठोर करण्याची गरजही व्यक्त करण्यात येते आहे. नुपूर शर्मा यांच्या पैगंबराबाबतच्या वादग्रस्त प्रकरणानंतर त्यांना मारण्याच्या अनेक धमक्या अनेक दहशतवादी संघटनांकडून देण्यात येतच आहेत.