Operation Bharatvarsh : भाजप खासदार रामदास तडस यांचा पर्दाफाश

नवी दिल्ली : ‘टीव्ही 9 भारतवर्ष’च्या ‘ऑपरेशन भारतवर्ष’ या स्टिंगमधून महाराष्ट्रातील वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांचा पर्दाफाश झाला आहे. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी 10 कोटी रुपये मी खर्च केले, यावेळी 25 कोटी रुपये खर्च करेन, असे भाजप खासदार रामदास तडस यांनी ‘ऑपरेशन भारत’अंतर्गत करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये म्हटलं आहे. तसेच, डमी उमेदवार उभे करण्यासाठी 4-4 […]

Operation Bharatvarsh : भाजप खासदार रामदास तडस यांचा पर्दाफाश
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

नवी दिल्ली : ‘टीव्ही 9 भारतवर्ष’च्या ‘ऑपरेशन भारतवर्ष’ या स्टिंगमधून महाराष्ट्रातील वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांचा पर्दाफाश झाला आहे. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी 10 कोटी रुपये मी खर्च केले, यावेळी 25 कोटी रुपये खर्च करेन, असे भाजप खासदार रामदास तडस यांनी ‘ऑपरेशन भारत’अंतर्गत करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये म्हटलं आहे. तसेच, डमी उमेदवार उभे करण्यासाठी 4-4 कोटी रुपये खर्च केल्याचेही भाजप खासदार रामदास तडस यांनी कबुल केले.

भाजप खासदार रामदास तडस यांचा पर्दाफाश :

  • 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी 10 कोटी रुपये मी खर्च केले, यावेळी 25 कोटी रुपये खर्च करेन – रामदास तडस
  • डमी उमेदवार उभे करण्यासाठी 4-4 कोटी रुपये खर्च केले – रामदास तडस
  • पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारण्यासाठी मी तयार – रामदास तडस
  • निवडणुकीसाठी 5 कोटी मिळाले – रामदास तडस
  • पूर्ण निवडणूक कॅशने लढवल्या जातात – रामदास तडस
  • नोटाबंदीचा काळ्या पैशावर कसलाही फरक पडला नाही – रामदास तडस

भाजप आमदार राम कदम यांची प्रतिक्रिया

“टीव्ही 9 भारतवर्षच्या स्टिंगमध्ये असलेला आवाज भाजप खासदार रामदास तडस यांचा आवाज कशावरुन? जॉनी लिव्हरसारखे कलाकार कुणाचेही आवाज काढतात.”, असे भाजप आमदार राम कदम यांनी म्हटले. राम कदम यांनी ‘टीव्ही 9 भारतवर्ष’च्या स्टिंग ऑपरेशन संशय व्यक्त केला. मात्र, ज्यांचं स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं, त्या रामदास तडस यांनी मात्र स्टिंग ऑपरेशन फेटाळले नाहीत. मात्र, त्यातील संवादाबाबत रामदास तडस यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली.

दोनच दिवसांपूर्वी म्हणजेच, एक एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा रामदास तडस यांच्याच लोकसभा मतदारसंघात म्हणजे वर्धा जिल्ह्यात घेतली होती. आता रामदास तडस यांचाच स्टिंग ऑपरेशनमधून पर्दाफाश झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

रामदास तडस कोण आहेत?

रामदास तडस हे भाजपचे वर्धा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. 2009 साली रामदास तडस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 साली वर्धा लोकसभा निवडणूक तडस यांनी भाजपमधून लढवली आणि विजयी झाले. वर्ध्यातील देवळी नगरपरिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी तीनवेळा काम पाहिले. त्यानंतर 2007 ते 2009 या काळात परिवहन महामंडळात तडस संचालक होते. 2014 साली लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर, त्यांची केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

VIDEO : खासदार रामदास तडस यांचा पर्दाफाश, पाहा स्टिंग ऑपरेशन

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.