उत्तर प्रदेशातून बसपाला हद्दपार करुन आरपीआयचा झेंडा फडकवणार; आठवलेंची सहारणपुरातून बहुजन कल्याण यात्रा सुरु

बसपाला हद्दपार करून उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा फडकविणार असा निर्धार आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला

उत्तर प्रदेशातून बसपाला हद्दपार करुन आरपीआयचा झेंडा फडकवणार; आठवलेंची सहारणपुरातून बहुजन कल्याण यात्रा सुरु
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 5:56 PM

सहारनपूर : उत्तर प्रदेशात चार वेळा मुख्यमंत्री पद मिळालेल्या बसपा नेतृत्वाने दलितांच्या विकासासकडे न्याय हक्कांकडे दुर्लक्ष केल्यामुळे बसपावरील दलितांचा विश्वास उडाला आहे. बसपाचे दलितांकडे लक्ष नाही. केवळ निवडणुकीत दलित मतांचा केवळ वापर करण्याकडे बसपाचे लक्ष आहे. त्यामुळे बसपाला हद्दपार करून उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा फडकविणार असा निर्धार आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित बहुजन कल्याण यात्रेचा शुभारंभ आज सहारणपूर येथे रामदास आठवले यांच्या नेतृत्वात करण्यात आला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत रामदास आठवले बोलत होते. (we will win Uttar Pradesh election 2022 with BJP says Ramdas Athawale)

रिपाइंची बहुजन कल्याण यात्रा रिपाइंचे उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता यांच्या नेतृत्वात 26 सप्टेंबर ते 18 डिसेंबर पर्यंत उत्तर प्रदेशातील 75 जिल्ह्यांमध्ये फिरून 18 डिसेंबर ला लखनौ येथील माता रमाई आंबेडकर मैदानात जनसभेद्वारे समारोप करण्यात येणार आहे. बहुजन कल्याण यात्रेच्या शुभारंभ सहारनपूर येथील जन मंच ऑडिटोरियम येथे जाहीर सभेद्वारे करण्यात आला. यावेळी रिपाइंचे पवन गुप्ता, जवाहर लाल आदी उपस्थित होते.

आठवले म्हणाले की, “डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाची स्थापना 3 ऑक्टोबर 1957 रोजी करण्यात आली. बहुजन समाज पक्षाचा जन्म होण्याआधी उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्ष प्रबळ होता. मात्र उत्तर प्रदेशातून रिपब्लिकन पक्षाला हद्दपार करून बसपाने रिपाइंचे स्थान मिळविले. मात्र आता आमचा निर्धार आहे की, उत्तर प्रदेशातून बसपाला हद्दपार करून आरपीआयचा निळा झेंडा आम्ही फडकवणार!”

भाजप-रिपाइंला 300 जागा मिळणार : आठवले

उत्तर प्रदेश च्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत आरपीआयची युती बाबत बोलणी सुरू आहे. बहुजन कल्याण यात्रेद्वारे उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर भाजप रिपाइं युतीचा निर्णय निश्चित होईल. भाजप आरपीआय युती झाल्यास उत्तर प्रदेशात भाजपला 300 पेक्षा जास्त जागा जिंकता येतील, असा अंदाज आठवले यांनी व्यक्त केला.

यूपीत आठवले शक्तीप्रदर्शन करणार

उत्तर प्रदेशात रिपाइं तर्फे आज सहारनपूर येथून सुरू केलेल्या बहुजन कल्याण यात्रेत रामदास आठवले सहारनपूर, आग्रा, झाशी, वाराणसी, कुशीनगर आणि लखनौ येथील सभांना संबोधित करणार आहेत. बहुजन कल्याण यात्रेद्वारे संपूर्ण उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचे प्रचंड शक्तिप्रदर्शन घडवणार असल्याचा निर्धार रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

इतर बातम्या

दिल्लीत जेवणाच्या टेबलवर आजी, माजी आणि भावी, ठाकरे-शहा एकमेकांच्या बाजूला, नेमकं काय शिजलं असेल?

नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्या; उद्धव ठाकरेंचं शहांसमोर सादरीकरण

मोदी माझ्यावर जळतात, रोमला जाण्यास परवानगी नाकारल्याने ममता बॅनर्जी संतापल्या

(we will win Uttar Pradesh election 2022 with BJP says Ramdas Athawale)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.