Weather Alert : दिल्ली गारठली, महाराष्ट्र कुडकुडणार? काय आहे हवामानाच अंदाज

पुढील तीन दिवस थंडीत आणखी वाढ होणार आहे. इतकंच नाही तर आज धुक्यामुळे तब्बल 22 गाड्या उशिराने धावत आहेत.

Weather Alert : दिल्ली गारठली, महाराष्ट्र कुडकुडणार? काय आहे हवामानाच अंदाज
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 10:54 AM

नवी दिल्ली : उत्तर भारतात (North India) थंडी काही कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या 3 ते 4 दिवसांत थंडीचा कहर आणखी वाढणार आहे. बर्फाच्छादित हवा वेगाने वाहत असल्यामुळे थंडीमध्ये वाढ होणर असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर अनेक भागांत धुक्याची (Fog) चादरही असणार आहे. (Weather Alert maharashtra weather update delhi cold wave republic day delhi cold updates imd)

डोंगराळ भागात हिमवृष्टीमुळे देशाच्या उत्तर भागातही बर्फवृष्टी वाढत आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर प्रदेशात कडाक्याची थंडी पडणार आहे. या ठिकाणी पुढील तीन दिवस थंडीत आणखी वाढ होणार आहे. इतकंच नाही तर आज धुक्यामुळे तब्बल 22 गाड्या उशिराने धावत आहेत.

पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, सौराष्ट्र आणि कच्छ इथं पुढच्या 4-5 दिवसांमध्ये शीतलहरीची (Cold Wave) शक्यता आहे. जसजश्या शीतलहरी वाढत जातील, तसतसा हिवाळा आणखी वाढेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे.

मुंबई – पुण्यासह महत्त्वाचे जिल्हे गारठणार

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात थंडी दिसून आली. त्यानंतर आता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी प्रजासत्ताक दिनापासून ते पुढच्या दोन दिवसांमध्ये किमान तापमानासह जास्तीत जास्त तापमान कमी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामानातल्या या बदलांमुळे मुंबई, पुण्यासह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये थंडी वाढणार आहे.

पुण्यातही पुढचे दोन दिवस कोरड्या हवामानाची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पार दोन अंश सेल्सिअसने घसरेल असा अंदाज रविवारी हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबईचे किमान तापमान गुरुवारीपासून सातत्याने कमी होताना दिसून आलं. पूर्वोत्तर भागातून थंड हवा वाहू लागली आहे. याचा परिणाम मुंबईच्या किमान आणि जास्तीत जास्त तपमानावर होईल. तापमान एक ते दोन अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल. तर आठवडाभर असंच तापमान असेल असाही इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

मराठवाडा आणि विदर्भात पाऊस

खरंतर, मराठवाडा ते बिहार दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील वातावरणातही बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या गुरुवारी मराठवाडा आणि विदर्भाच्या काही महत्त्वाच्या भागांमध्ये आणि घाटमाथ्यावर पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता बदलत्या हवामानाविषयी बोलायचं झालं तर गेल्या 6 महिन्यापासून वारंवार हवामानात बदल होत आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचं वातावरण तयार झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम हवामानावर होतो. यामुळे थंडी आणि पाऊस असं वातावरण सध्या सुरू आहे. (Weather Alert maharashtra weather update delhi cold wave republic day delhi cold updates imd)

संबंधित बातम्या – 

Weather Alert : मुंबई, पुण्यात थंडी वाढणार तर ‘या’ जिल्ह्यांमध्ये 2 दिवसांत पावसाची शक्यता

Weather Alert : राज्यात 2 दिवसांत थंडी होणार कमी, तर ‘या’ तारखेला पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

(Weather Alert maharashtra weather update delhi cold wave republic day delhi cold updates imd)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.