West Bengal By-Poll : भवानीपूरमधून ममता बॅनर्जींचा विक्रमी मतांनी विजय, भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांचा मोठा पराभव
भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत (West Bengal Assembly by Election)मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा विक्रमी मतांनी विजय झालाय. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममधून (Nandigram) भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी (Shubhendu Adhikari) यांच्याविरोधात ममता बॅनर्जी यांना पराभव पत्करावा लागला होता.
कोलकाता : पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत (West Bengal Assembly by Election)मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा विक्रमी मतांनी विजय झालाय. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममधून (Nandigram) भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी (Shubhendu Adhikari) यांच्याविरोधात ममता बॅनर्जी यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचीच सत्ता स्थापन झालीय. अशावेळी ममता बॅनर्जी यांच्यासाठी आमदार शोभनदेव यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांचा मोठा फरकाने पराभव केला आहे. ममता बॅनर्जी यांनी प्रियंका टिबरेवाल यांचा 58 हजार 832 मतांनी पराभव केलाय. (CM Mamata Banerjee wins Bhawanipur Assembly by-election)
भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. एकूण 21 राऊंड झाले. त्यानंतर 58 हजार 832 मतांनी ममता बॅनर्जी यांनी विजय मिवळला आहे. त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांनी भवानीपूरमधून हॅटट्रिक मिळवली आहे. ममता बॅनजी यांनी यापूर्वी दोन निवडणुकीत भवानीपूर मतदारसंघातून दोनवेळा विजयी झाल्या होत्या. दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता स्थापन झाली आणि ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. अशावेळी 6 महिन्याच्या आत त्यांना निवडणूक लढवणं गरजेचं होतं. त्यामुळे भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून शोभनदेव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्या जागेवर पार पडलेल्या पोटनिवडणुकीत अखेर ममता बॅनर्जी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
#UPDATE | West Bengal CM Mamata Banerjee leads by 58,389 votes in Bhabanipur Assembly bypolls after the last round of counting https://t.co/0cJTMeJ1uR
— ANI (@ANI) October 3, 2021
विरोधकांची मोट बांधण्यासाठी तृणमूल प्रयत्नशील
विधानसभा पोटनिवडणुकीतील ममता बॅनर्जी यांचाय विजय हा बंगालपूरता मर्यादित असणार नाही. राष्ट्रीय राजकारणात ममता बॅनर्जी यांचं स्थान अधिक गडद होणार आहे. तसंच विरोधकांची मोट बांधण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना अधिक गती प्राप्त होणार आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन करताना ” ममता दीदी जी की जीत है वही तो सत्यमेव जयते की रीत है” असं म्हटलंय. त्यामुळे पुढील काळात भाजप विरोधात पुन्हा एकदा विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला तर संयोजक म्हणून ममता बॅनर्जी यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. त्याचबरोबर विरोधकांच्या एकजुटीचा त्या चेहरा बनू शकतील. महत्वाची बाब म्हणजे याबाबत तृणमूल काँग्रेसनं यापूर्वीच जाहीर केलं आहे की ममता बॅनर्जी देशाला मार्ग दाखवतील. अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेस शांत बसली असेल तर टीएमसी बसून राहणार नाही, असं वक्तव्य करून तृणमूल काँग्रेसची पुढील दिशा स्पष्ट केली आहे.
ये जो ‘ममता दीदी जी’ की जीत है वही तो ‘सत्यमेव जयते’ की रीत है@MamataOfficial @AITCofficial
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) October 3, 2021
तृणमूल काँग्रेस गोवा विधानसभा निवडणूक लढवणार
ममता बॅनर्जी यांनी गोवा विधानसभेच्या निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर गोव्यात तृणमूल काँग्रेसमध्ये चैतन्य संचारलं आहे. ममता बॅनर्जींनी निवडणुकीची घोषणा करताच गोव्यात ममता दीदींचे पोस्टर झळकले आहे. पणजी विमानतळाच्या परिसरात हे पोस्टर झळकले असून त्यावर गोयंची नवी सकाळ असं लिहिलं आहे. तसेच विमानतळाजवळ तृणमूल कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केलं आहे.
इतर बातम्या :
CM Mamata Banerjee wins Bhawanipur Assembly by-election