What India Thinks Today: भूपेंद्र यादव ग्लोबल समिटमध्ये म्हणाले, ‘रोजगारा’ ची परिस्थिती आव्हानात्मक आहे, सरकारी पदे लवकरच भरली जातील
भूपेंद्र यादव म्हणाले की, देशात उत्पादकता वाढली असून, विविध घटकांवरून, असे निदर्शनात येते की भारतात, कृषी व्यतिरिक्त, आयटी, वाहतूक, वस्त्रोद्योग, ऑटोमोबाईल यासारख्या इतर नऊ क्षेत्रांमध्ये रोजगार वाढला आहे.
देशातील पहिल्या क्रमांकाच्या Tv9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ या दोन दिवसीय ‘ग्लोबल समिट’ मध्ये सहभागी होत, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी पुढील दीड वर्षात 10 लाख सरकारी नोकऱ्या (Government jobs) देण्याबाबत सांगितले. देशात, परिस्थिती आव्हानात्मक (The situation is challenging) आहे. येत्या 18 महिन्यांत 10 लाख नोकऱ्या देण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. अग्निपथ योजनेवर सुरू असलेल्या विरोधावर भूपेंद्र यादव म्हणाले की, हा विरोध न्याय्य नाही. योजनेबाबत अत्यंत विचारपूर्वक निर्णय (Thoughtful decision) घेण्यात आला आहे. रोजगार देण्याच्या योजनेबाबत केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, रोजगाराबाबत अनेक आव्हाने आहेत. सरकार 18 महिन्यांत 10 लाख नोकऱ्या देईल, अशी घोषणा केली होती. लवकरच रिक्त शासकीय पदेही भरण्यात येणार आहेत.
TV9 ग्लोबल समिट ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ला विविध क्षेत्रातील नामवंतांनी हजेरी लावली आणि अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. केंद्रीय कामगार, रोजगार आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांनीही या समिटमध्ये सहभाग घेतला. यावेळी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, ‘देशातील 90 टक्के रोजगार असंघटित क्षेत्रातून येतो आणि स्वातंत्र्यानंतर कोणते काम झाले याची आकडेवारी अद्याप उपलब्ध नाही. यासोबतच वेतनातील असमानता दूर करून सर्व घटकांना सामाजिक सुरक्षा देण्याचे काम सरकारने केले आहे’.
‘ई श्रम पोर्टल’ मध्ये 28 कोटी लोकांची नोंदणी
यावेळी यादव यांनी सांगितले की, असंघटित वर्गासाठी ‘ई-श्रम पोर्टल’ सुरू करण्यात आले होते, ज्यामध्ये 28 कोटी लोकांनी नोंदणी केली आहे. सोबतच त्याचा फायदा कसा होणार हे सांगितले. रोजगाराबाबत विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत असलेल्या प्रश्नांवर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, ‘संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रात रोजगार वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भारतात संघटित आणि असंघटित क्षेत्रात रोजगार वाढला आहे आणि लवकरच सरकारी विभागांमधील रिक्त पदेही भरली जातील.
सर्वांना कामगार सुरक्षा देत आहोत
भूपेंद्र यादव म्हणाले की, पीएफचे आकडे पाहिले तर त्यातही रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. देशात उत्पादकता वाढली आहे आणि अशा प्रकारे असे अनेक संकेतक आहेत जे दर्शवितात की कृषी व्यतिरिक्त, आयटी, वाहतूक, वस्त्रोद्योग, ऑटोमोबाईल यासारख्या इतर नऊ क्षेत्रांमध्ये रोजगार वाढला आहे. आम्ही भारतातील प्रत्येकाला कामगार संरक्षण देत आहोत.
120 मिमिपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक होणार बंद
केंद्रीय कामगार आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी यावेळी सांगितले की, 120 मिमीपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या वस्तूंवर 1 जुलैपासून पूर्णतः बंदी घालण्यात येणार आहे. देशातील वाढत्या प्रदूषणाच्या पातळीबाबत ते म्हणाले की, होय, या संदर्भात अनेक आव्हाने आहेत. आव्हानांशिवाय जग चालत नाही, पण त्यासाठी काम केले जात आहे. वन मंत्रालय आणि जलसंपदा मंत्रालय हे सर्व या दिशेने काम करत आहेत. दिल्लीचा विचार करता, दिल्लीतील पूर्व आणि पश्चिम महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. पीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिला जात आहे. राष्ट्रीय हरित भारत अभियानाचे कामही सुरू आहे.