AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon : राज्यात मान्सूनचा लहरीपणा कायम, हवामान खात्याच्या ‘यलो अलर्ट’नंतर काय स्थिती?

मान्सूनने महाराष्ट्र व्यापला असे सांगितले जात असले तरी अपेक्षित पावसाची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळेच राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पेरण्या रखडलेल्या आहेत. यासंदर्भात कृषी विभागाने अहवाल सादर केला असून देशात गतरर्षीपेक्षा 22 टक्के कमी क्षेत्रावर पेरण्या झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Monsoon : राज्यात मान्सूनचा लहरीपणा कायम, हवामान खात्याच्या 'यलो अलर्ट'नंतर काय स्थिती?
वसई-विरार, पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर
| Edited By: | Updated on: Jun 20, 2022 | 12:18 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र (Monsoon) मान्सूनने व्यापला असला तरी अपेक्षित बरसत नाही हे स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच (Meteorological Department) हवामान विभागाने राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी केला होता. त्यानंतरही विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर पावसाने हजेरी लावलेली नाही. तुरळक ठिकाणीच मुसळधार पाऊस पडत असल्याने (Marathwada) मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अद्यापही कोरडाच आहे. सध्या कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबईसह उपनगरामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये याच भागात संततधार सुरु असून अपेक्षित पाऊस नसल्याने मात्र, खरिपातील पेरण्या ह्या रखडलेल्याच आहेत. नैऋत्य मोसमी वाऱ्याने विदर्भाचा काही भाग कव्हर करुन गुजरात आणि मध्य प्रदेशात आगेकूच केली आहे. कोकणासह मुंबई आणि मध्य महाराष्ट्रातही मान्सून प्रगतीपथावर असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

  1. यवतमाळमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी गेल्या दोन दिवसांपासू ढगाळ वातावरण अन् सोमवारच्या पहाटे पावसाला सुरवात झाली होती. पहाटे 5 च्या दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, कळंब तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. सुमारे पाऊण तास हा पाऊस पडला. तर, मारेगाव, बाभूळगाव, या तालुक्यात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे उकाड्यापासून तर दिलासा मिळाला आहेच पण सोयाबीनच्या पेरणी तर कपाशी लागवड कामाला वेग लागला आहे.
  2. बीडमध्ये 13 गावांचा संपर्क तुटला बीडचा वडवणी तालुक्यातील पुसरा येथील पूल पहिल्याच पावसात वाहून गेलाय, परिणामी 13 गावांचा संपर्क तुटला आहे. रात्री झालेल्या पावसात एक दुचाकीस्वार यात वाहून गेला माञ ग्रामस्थांच्या मदतीने याला वाचविण्यास यश आलंय. मान्सून मध्ये प्रत्येक वर्षी या पुलाची हीच दुरावस्था होते. लोकप्रतिनिधींना सांगून देखील अद्याप हा प्रश्न जैसे थेच आहे.
  3. वसई-विरारमध्ये जोरदार हजेरी वसई- विरारमध्ये पावसाने सातत्य राखले आहे. सलग तीन दिवस पाऊस पडत असून सोमवारी सकाळीच विरार नालासोपारा शहरात जोरदार पावसाला सुरवात झाली होती. परिसरात आभाळ पूर्णता काळकूट झाला असून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी सकाळीही पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शहरातील सकल भागात पावसाचे पाणी साचले आहे.
  4. मुंबई उपनगरातही पावसाच्या सरी मुंबईसह उपनगरात पावसाने सातत्य ठेवले आहे. कोकणासह मुंबईत पाऊस सक्रीय झाल्याचे चित्र आहे. हवामान खात्याकडून यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात आगमन झाल्यानंतर मान्सून मुंबईमध्ये चांगलाच बरसत आहे.
  5. खरिपाच्या पेरण्या रखडलेल्याच मान्सूनने महाराष्ट्र व्यापला असे सांगितले जात असले तरी अपेक्षित पावसाची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळेच राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पेरण्या रखडलेल्या आहेत. यासंदर्भात कृषी विभागाने अहवाल सादर केला असून देशात गतरर्षीपेक्षा 22 टक्के कमी क्षेत्रावर पेरण्या झाल्याचे सांगण्यात आले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.