वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी धावणार? रेल्वेमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट
भारतीय रेल्वे लवकरच राजधानी एक्सप्रेसप्रमाणे वंदे भारत एक्सप्रेसमध्ये स्लीपर कोच सुरु करण्याची तयारी करत आहे, त्यामुळे लोकं झोपेतही लांबचा प्रवास करू शकतील. सध्या फक्त जवळच्या अंतरासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरु आहेत. या रेल्वेला सध्या देशात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ही सध्या भारतातील सर्वात वेगवान सेमी-हाय स्पीड ट्रेन आहे. पण सध्या ती फक्त चेअर कोचमध्ये आह. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणे या गाडीने कठीण आहे. प्रवाशांना झोपून प्रवास करता यावा म्हणून भारतीय रेल्वे स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची तयारी करत आहे. पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस दिल्ली आणि श्रीनगर दरम्यान धावणार आहे. पण या ट्रेनची ट्रायल कधी सुरु होणार याबाबत अजून माहिती आलेली नाही. यासंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत लेखी माहिती दिली आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत सांगितले की, वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर ट्रेनचा पहिला नमुना तयार झालाय. आता त्याची चाचणी लवकरच सुरू होणार आहे. याशिवाय, ही पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन दिल्ली-श्रीनगर दरम्यान कधी धावेल हे देखील रेल्वेमंत्र्यांनी सांगितले आहे. पहिली वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर ट्रेन पहिल्या प्रोटोटाइपच्या यशस्वी चाचणीनंतरच नियमितपणे चालवली जाणार आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत दिलेल्या निवेदनात म्हटले की, सध्या लांब आणि मध्यम अंतराच्या प्रवासासाठी वंदे भारत स्लीपर गाड्या आधुनिक सुविधा आणि प्रवाशांच्या सुविधांनी सुसज्ज असणार आहेत. या गाड्या वैशिष्ट्यपूर्ण चिलखत, EN-45545 HL3 अग्निसुरक्षा मानकांचे पालन करणाऱ्या ट्रेन्स, क्रॅशयोग्य आणि धक्का-मुक्त अर्ध-स्थायी कपलर्स आणि अँटी क्लाइंबर्सने सुसज्ज आहेत.
वंदे भारत एक्सप्रेसच्या स्लीपर कोच ट्रेनमध्ये आपात्कालीन परिस्थितीत प्रवासी आणि ट्रेन मॅनेजर/लोको पायलट यांच्यात संवाद साधण्यासाठी आपत्कालीन टॉक-बॅक युनिट देखील स्थापित केले जाईल. वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांच्या डब्यांमध्ये एअर कंडिशनिंग, सलून लाइटिंग आदी सुविधा उपलब्ध असतील.
वंदे भारत एक्सप्रेसच्या वैशिष्ट्यांबाबत सांगण्यात आले की, ट्रेनच्या सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतील. प्रवाशांना वरच्या बर्थवर सहज चढण्यासाठी एर्गोनॉमिकली डिझाइन केलेला जिना देखील मिळेल. ट्रेनमध्ये आधुनिक टॉयलेट सीटही उपलब्ध असतील.
तामिळनाडूमध्ये धावत आहेत सर्वाधिक १६ वंदे भारत एक्सप्रेस
कमी अंतराच्या वंदे भारत ट्रेन सेवेबद्दल बोलताना, रेल्वे मंत्री म्हणाले की, 02 डिसेंबर 2024 पर्यंत, चेअर कार कोचसह 136 वंदे भारत ट्रेन सेवा धावतील. यापैकी 16 वंदे भारत एक्सप्रेस सेवा तामिळनाडू मध्ये चालू आहेत. भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि बनारस (दिल्ली-वाराणसी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन) दरम्यान सर्वात लांब पल्ल्याच्या वंदे भारत ट्रेन सेवा धावत आहेत जी 771 किमी अंतर कापते.