Bageshwar Baba : दिव्यदृष्टीने मनातलं ओळखतात, चमत्काराचं आव्हानही स्वीकारलं; कोण आहेत चर्चेत असलेले बागेश्वर बाबा?

बागेश्वर उर्फ धीरेंद्र कृष्ण यांनी 12 वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्यांनी हळूहळू वडिलांप्रमाणेच कथा वाचण्यास सुरुवात केली. माझे वडील मला शिक्षणासाठी वृंदावनला पाठवू शकले नाहीत.

Bageshwar Baba : दिव्यदृष्टीने मनातलं ओळखतात, चमत्काराचं आव्हानही स्वीकारलं; कोण आहेत चर्चेत असलेले बागेश्वर बाबा?
Pandit dhirendra krishna shastriImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 2:09 PM

जयपूर: दिव्यदृष्टीने पाहिजे त्या गोष्टी ओळखतो, असा दावा करणारे बागेश्वर बाबा सध्या भलतेच चर्चेत आहेत. त्याला कारणही तसंच आहे. त्यांनी नागपूरमध्ये येऊन आपला दरबार भरवला. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष श्याम मानव यांनी त्यांना थेट चमत्कार सिद्ध करण्याचं आव्हानच दिलं. चमत्कार करून दाखवला तर 30 लाख रुपयांचं बक्षीस देऊ असं श्याम मानव म्हणाले. बागेश्वर बाबांनीही हे आव्हान स्वीकारलं आहे. पण त्यांनी एक अट ठेवलीय. ते म्हणजे मी नागपूरला येऊन चमत्कार करून दाखवणार नाही. तर रायपूरला तुम्हालाच यावं लागेल, असं या बाबाने म्हटलंय. त्यामुळे बागेश्वर बाबा अधिकच चर्चेत आले आहेत. कोण आहेत हे बागेश्वर बाबा? त्याचा घेतलेला हा धांडोळा…

छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बागेश्वर दाम हनुमान मंदिरात रोज हजारो भाविक येत असतात. याच धामचे पुजारी आणि कथावाचक पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री अचानक प्रसिद्धीस आले आहेत. हेच पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजे बागेश्वर बाबा होय.

हे सुद्धा वाचा

बालपण गरीबीत

बागेश्वर बाबांचा जन्म 4 जुलै 1996मध्ये झाला. छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात बागेश्वर बाबांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामकृपाल गर्ग आणि आईचे नाव सरोज गर्ग आहे. त्यांना तीन मुलं आहेत. त्यामध्ये बागेश्वर हे सर्वात मोठे आहेत. बागेश्वर यांचं बालपण गरीबीत गेलं.

म्हणून शिक्षण झालं नाही

बागेश्वर उर्फ धीरेंद्र कृष्ण यांनी 12 वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्यांनी हळूहळू वडिलांप्रमाणेच कथा वाचण्यास सुरुवात केली. माझे वडील मला शिक्षणासाठी वृंदावनला पाठवू शकले नाहीत. कारण त्यांच्याकडे त्यावेळी एक हजार रुपये नव्हते, असं बागेश्वर बाबा सांगतात.

भविष्य सांगण्याची सिद्धी

त्यांच्या गावात हनुमानाचं मंदिर आहे. याच बालाजी मंदिरात त्यांचे आजोबा भगवानदास गर्ग यांची समाधी आहे. त्यांचे आजोबा सिद्धपुरुष होते. आजोबांचा आशीर्वाद आणि तपश्चर्येमुळे आपल्यालाही भविष्य सांगण्याची सिद्धी प्राप्त झाल्याचा त्यांचा दावा आहे.

लोकांची नाव ओळखतात

बागेश्वर बाबा आपल्या दरबारात कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बोलावतात, तो व्यक्ती जवळ येईपर्यंत त्याचं नाव, पत्ता एका चिठ्ठीवर लिहून देतात. एवढेच नव्हे तर भर दरबारात बाबा त्या व्यक्तिच्या समस्याही सांगतात, असा दावा बागेश्वर बाबांचे भक्त करतात.

त्यांच्या या दाव्यामुळेच ते सातत्याने वादात असतात. आता श्याम मानव यांनीही त्यांना हा चमत्कार सिद्ध करण्याचं आव्हान दिलं आहे. हा चमत्कार सिद्ध केल्यास 30 लाख रुपयांचं बक्षीस देण्याचं आव्हान दिलं आहे.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.